Saturday, January 11, 2025

Latest Posts

भाजप नेते अशोक चव्हाण म्हणालेत… त्यांचे हे विधान चुकीचे

Ashok Chavan latest News : मुंबईत इंडिया आघाडीची सभा पार पडली.यात अनेक दिग्गज नेल्यांनी भाजपवर टीका केली.यात राहुल गांधी यांनी देखील मोदींवर थेट आरोप लगावले.यावेळी त्यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बद्दल वक्तव्य केले.त्यावर चव्हाण यांनी आज नांदेड येथे प्रसार माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले.त्यांनी राहुल गांधींच्या त्या विधानावर ते चुकीचे असल्याचे सांगितले. (ashok chavhan on rahul gandhi statement)

मी कधीही सोनिया गांधी यांना भेटलो नाही आणि माझी भावना व्यक्त केली नाही. यामुळे (Ashok chavhan nanded news) राहुल गांधी यांचे विधान माझ्या संदर्भात असेल तर ते हास्यास्पद आहे. त्यांचे हे विधान चुकीच आहे; अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण  यांनी दिली.

. मी सोनिया गांधी यांना भेटलो नाही

मुंबईत १७ मार्चला झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत राहुल गांधी  यांनी नाव न घेता एक काँग्रेस नेता भीतीपोटी  भाजपमध्ये गेले असून, त्या नेत्याने आपल्या आईसमोर रडून व्यथा मांडल्याचे ते म्हणाले. यावर अशोक चव्हाण यांनी उत्तर देताना सांगितले. मी सोनिया गांधी यांना भेटलो नाही. त्यामुळे मी सोनिया गांधी यांना भेटून माझी भावना व्यक्त केल्याचे विधान चुकीचे आणि दिशाभूल करण्यासारखं असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस (Congress) पक्षाचे काम करत होतो. मी पक्ष सोडेपर्यंत ही माहिती कोणालाही नव्हती ही वास्तव आहे; असं चव्हाण म्हणाले. त्यामुळे राहुल गांधी यांचे विधान माझ्या संदर्भात असेल तर ते चुकीचं आहे. असं अशोक चव्हाण म्हणाले. दरम्यान काँग्रेसचे नव्हे तर इतर पक्षाचे नेते भीती पोटी भाजप प्रवेश करत असल्याचे चव्हाण यांना विचारले असता इतरांबद्दल मी बोलणार नाही. प्रश्न माझ्याबाबत आहे. पण मी निर्णय घेताना भाजपचे भविष्य आणि भावि्तव्य असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

Latest Posts

Don't Miss