Sunday, January 12, 2025

Latest Posts

गुन्हा दाखल होताच पूजा खेडकर ‘नॉट रिचेबल’

| TOR News Network |

Pooja Khedkar Latest News : जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध छळवणुकीची तक्रार प्रकरणात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना दोन वेळा समन्स पाठवून सुद्धा त्या जबाब नोंदविण्यसाठी उपस्थित राहिल्या नाहीत. (Pooja Khedkar Absent to register answer ) याबाबत पुणे पोलिसांनी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. पूजा खेडकर विरोध दिल्लीत गुन्हा दाखल झाल्याने अटकेच्या भीतीने त्या नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे.(Pooja Khedkar nor Reachable)

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती असतांना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी छळ केल्याची तक्रार मागच्या आठवड्यात वाशीम पोलिसांकडे केली होती. (Pooja Khedkar on pune collector) हा प्रकार पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील असल्यामुळे ही तक्रार वाशिम पोलिसांनी पुणे पोलिसांकडे वर्ग केली. यानंतर पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना दोन वेळा समन्स पाठविले होते. (pune police Summons to pooja khedkar)मात्र दोन्ही समन्स पाठविल्यानंतरही त्या अनुपस्थित राहिल्या. यानंतर पुणे पोलिसांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. तसेच त्यांना व्हाटसअप वरून मेसेज केला असता तोसुद्धा त्यांना पोहचला नाही.(police whatss app to pooja khedkar)

तर दुसरीकडे पूजा खेडकर यांच्यावर युपीएसच्या वतीने दिल्लीत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (UPSC filed case on pooja khedkar) तसेच नोटीस बजावून कागदपत्रांच्या घोळाबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. तुमची उमेदवारी रद्द का करू नये, अशी विचारणा करत उमेदवारी रद्द करण्याबाबत नोटीस जारी केली आहे. यानंतर पूजा खेडकर या वाशीम येथून दिल्लीला जातील अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र पुणे पोलिसांबरोबर दिल्लीतही अनुउपस्थित राहिल्या. याप्रकरणात अटक होईल या भीतीने त्या नॉट रिचेबल असल्याचे चर्चा आहे.(Deu to arrest fear pooja khedkar switch off cell phone)

Latest Posts

Don't Miss