Thursday, January 16, 2025

Latest Posts

पुण्यात बचावकार्यासाठी लष्कारलाही अलर्ट : अजित पवार कंट्रोल रुममध्ये

| TOR News Network |

Mumbai Pune Rain Update News : पुण्यात पावसाने धुमाकूळ घातला असून, काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. (Pune Heavy Rain) मुंबई (Mumbai Flood Situation) आणि रायगडमध्ये (Raigad) पावसाने हजेरी लावली असून सर्वसामान्य जीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकी काय स्थिती आहे याची माहिती दिली आहे. पुण्यात बचावकार्यासाठी लष्कारलाही अलर्ट राहण्यास सांगण्यात आलं असल्याची एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.(Instruction to army for alert) तसंच मुंबईत अजित पवार कंट्रोल रुममध्ये असून, परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. (Ajit Pawar In control room)

“मुंबई, पुणे आणि रायगड येथे जास्त पाऊस पडत आहे.(Heavy Rain fall in mumbai-pune) महाराष्ट्रातील उर्वरित ठिकाणीही जास्त पाऊस पडत आहे. सर्व प्रशासनाला सकाळपासून सूचना दिल्या असून, अलर्ट मोडवर राहण्यास सांगण्यात आलं आहे. (Administration on alert mode) फिल्डवर उतरुन लोकांची मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यात खडकवासला तलावात आणि कॅचमेंट परिसरात खूप पाऊस पडला. मावळमध्ये जवळपास 255 मिमी पाऊस पडला. मुळशीत 170 मिमी पाऊस पडला. धरणातही आणि कॅचमेंटमध्येही जास्त पाऊस पडला असल्याने त्याचा दुहेरी फटका बसला आहे. यामुळे पुण्यात जास्त पाणी वाहून गेलं आणि साचलं. सर्वात आधी जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त तसंच एसडीआरएफ, एनडीआरएफ यांना सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक यंत्रणांनी सूचना दिल्या आहेत,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

“मी लष्करालाही अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मेजर जनरल अनुराग वीज हे घटनास्थळी आहेत. कर्नल संदीप यांच्याशीही बोलणं झालं आहे. नौदल, हवाई दलाच्या रेस्क्यू टीमही तैनात ठेवा, आवश्यक भासल्यास त्यांनाही हलवण्यास सांगण्यात आलं आहे,” असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.(Navy, Air Force rescue teams also deployed)

“एखाद्या ठिकाणी अडकलेल्या लोकांना एअरलिफ्ट करावं लागल्यास ती तयारी ठेवण्यात आली आहे.(Ready to Air lift) सर्वजण तयार आहेत. आरोग्य, पोलीस आणि बचाव यंत्रणा सर्वांना एकत्रित काम करत पुणेकरांना मदत करण्यास सांगण्यात आलं आहे. पूरपरिस्थिती आहे तेथील लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यास सांगण्यात आलं आहे. त्यांचं पाणी, फूड पॅकेट यांच्या व्यवस्था केल्या आहेत.(Food Packets to supply) राहण्याची व्यवस्थाही केली आहे. शाळा आणि कार्यालयांना सुट्टी देण्याचा आदेश दिला आहे. (Holiday to all school )सर्व परिस्थितीवर माझं लक्ष आहे. सर्व अधिकारी माझ्या संपर्कात आहेत,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. (Cm Shinde On Pune-mumbai Heavy Rain)

Latest Posts

Don't Miss