Sunday, January 12, 2025

Latest Posts

असा असेल ॲपलचा फोल्डेबल आय फोन

Apple Launching Foldable cell Phone : फोल्डेबल फोनची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. दिसायला सुंदर आणि हातात मावेल अशा या फोल्डेबल फोनने अनेक युजर्सना वेड लावले आहे. अशातच मिळालेल्या माहितीनुसार अॅपल लवकरच फोल्डेबल फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. (Apple Folded cell Phone)

ॲपल कंपनी पहिला फोल्डेबल डिवाइस लॉन्च करणार आहे. (Apple Flip Phone) हा डिवाइस विकासाच्या टप्प्यावर आहे. रिपार्टनुसार अॅपलचा (Apple) हा फोल्डेबल फोन मोठ्या स्क्रिनसह येऊ शकतो. परंतु, हा फोन असेल की, टॅबलेट याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

काही काळापूर्वी अॅपलच्या फोल्डेबल टॅबलेटची माहिती समोर आली होती. अॅपलच्या या फोल्डेबल डिव्हाईसमध्ये ७ किंवा ८ इंचाचा डिस्प्ले असू शकतो. रिपोर्टनुसार अॅपलचा हा फोल्डेबल डिव्हाईस स्मार्टफोन (Apple Folded Smartphone) असू शकतो असे देखील म्हटले आहे. हा फोल्डेबल स्मार्टफोन किंवा टॅबलेट २०२६ किंवा २०२७ मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.(Apple Folded Phone Release Date)

मिळालेल्या माहितीनुसार अॅपलचा फोल्डेबल स्मार्टफोन आयपॅड मिनीची जागा घेऊ शकतो. हा 8.3-इंच लिक्विड रेटिना LCD IPS डिस्प्लेसह मिळणार आहे. यामध्ये A15 बायोनिक प्रोसेसर आहे. Apple ने 2021 मध्ये iPad Mini ची नवीन आवृत्ती लाँच केली. यात दोन स्टोरेज पर्याय ऑफर केले आहेत. 64GB आणि 256GB आणि ते पिंक, पर्पल स्टारलाईट आणि स्पेस ग्रे रंग पर्यायांमध्ये खरेदी केले जाऊ शकतात.

आयपॅड मिनीची जागा घेईल?

अॅपलचा हा नवा फोल्डेबल फोन आयपॅड मिनीची जागा घेऊ शकते. या अॅपलच्या फोल्डेबल डिव्हाईसमध्ये iPad Mini च्या तुलनेत मोठा अपग्रेड पाहायला मिळणार आहे. OLED डिस्प्ले पॅनल्स फोल्ड करण्यासोबत उपकरणांमध्ये वापरता येईल.तसेच यामध्ये हा मोठ्या 8.7 इंच स्क्रीनसह मिळू शकतो. Apple च्या आधी Samsung, OnePlus, Google, Xiaomi सारख्या ब्रँडने त्यांचे फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. अशा परिस्थितीत अॅपल आपल्या आगामी फोल्डेबल डिव्हाइससह या सर्व ब्रँडशी स्पर्धा करू शकते.

Latest Posts

Don't Miss