Saturday, January 11, 2025

Latest Posts

आणखी एक राष्ट्रवादीचा नेता बिश्नोई गँगच्या टार्गेटवर

| TOR News Network |

Bihsnoi Gang Latest News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. (Baba Siddiqui murder case) वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात रात्री 9.30च्या सुमारास तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला.( Baba Siddiqui shooted) या हत्याकांडामुळे प्रचंड खळबळ माजली असून मुंबईत दहशतीवचे वातावरण आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत तिघांना अटक केली आहे. (police arrested 3 accused) दरम्यान या घटनेमुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरत टीका केली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली आहे.अशात आता अणखी एक नेता बिश्नोई गँगच्या टार्गेटवर असल्याची माहिती आहे. (Another leader on target of Bihsnoi Gang)

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हेही चर्चेत आले आहेत. बाबा सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या याच बिश्नोई गँगकडून जितेंद्र आव्हाड यांनाही धोका असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी ाव्डा यांना फोनवरून धमकी मिळाली होती. (Jitendra Awhad got threat from bihsnoi gang) त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका संभवतो. याप्रकरणाची माहिती देऊनही पोलिसांनी आव्हाडांच्या सुरक्षेत वाढ केलेली नाही.

त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्यात धाव घेत आव्हाडांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. (demand Security for jitendra awhad) तसेच आव्हाड यांच्या घराबाहेरची सुरक्षाही वाढवावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. आव्हाड यांची सुरक्षा वाढवली नाही तर आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादीचे पदाधिकारी हेमंत वाणी यांनी दिला आहेय यावर आता पोलीस काय ॲक्शन घेतात, आव्हाडांची सुरक्षा वाढवली जाते का याकडे सर्वांचे लागले आहे.

Latest Posts

Don't Miss