Sunday, January 12, 2025

Latest Posts

अजित पवारांना परत एक मोठा झटका : माजी आमदार शरद पवारांना जुळणार

| TOR News Network |

Ajit Pawar Latest News : गेल्या काही दिवसात अनेक बड्या नेत्यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडली. (Many Leaders Left Bjp,Ajit Pawar Ncp ) त्यांनतर आता अजित पवार यांच्या गटाचे आमदार बाबाजानी दुरानी हेदेखील लवकरच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.(babajani durani to join Sharad Pawar Ncp) विशेष म्हणजे तसे संकेत खुद्द बाबाजानी दुरानी यांनीच दिलेत . शुक्रवारी  परभणीत  बाबाजानी दुरानी यांनी  शरद पवार यांची भेट घेतली. (Babajani Durani meet Sharad Pawar) त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथेही आमदार जयंत पाटील यांचीही भेट घेतली.(Durani Meet Jayant Patil)

यावेळी माध्यमांशी बोलताना दुरानी म्हणाले, “मी मनाने शरद पवार साहेबांसोबतच आहे. मी 1985 पासून शरद पवार साहेबांसोबत आहे. यापूर्वी सुद्धा मी एका विचाराने काम केलेलं आहेशरद पवार यांना भेटण्याचे मुख्य कारण म्हणजे भविष्यात मला पवार साहेबांसोबत काम करण्याची इच्छा आहे.  त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा अर्थ प्रवेश झाल्यासारखाच होतो.”

“समविचारी पक्षासोबत काम करणे सोपे जाते. पण भिन्न भिन्न विचारांच्या पक्षासोबत  काम करणे अवघड जाते.  कार्यकर्त्यानांही अवघड जाते,  मतदारही संभ्रमात पडतात. उपमुख्यमंत्री अजित पवार हेही फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारानेच काम करत आहेत. पण त्या ठिकाणी जे पक्ष आहेत. त्याच्यामुळे सगळेच आमच्यासारखे अल्पसंख्यांक विचाराच्या कार्यकर्त्याची विटंबना होत आहे, असेही दुरानी यांनी सांगितले.(Babajani Durani on Mahayuti)

 महायुतीत एका बाजूला भाजप तर दुसऱ्या बाजूला शिंदे गट असल्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे अवघड आहे. मी मनाने शरद पवारांसोबतच आहे. त्यामुळे  आता फक्त प्रवेशाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.(Babajani Durani to join Sharad Pawar NCP) पवार साहेब आणि आम्ही भविष्यात एका विचाराने काम करू.  त्यामुळे तुम्हाला लवकरच मोठी बातमी ऐकायला मिळेल, असे सुचक विधानही त्यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बाबाजानी दुरानी हे अजित पवारांसोबत गेले आणि भाजपसोबत सत्तेत सामील झाले. विशेष म्हणजे  त्यांची नुकतीच विधान परिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ संपला आहे. विधान परिषद निवडणुकीत त्यांनी अजित पवारांकडे पुन्हा तिकीट मागितले होतं.  पण त्यांना पुन्हा संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.

Latest Posts

Don't Miss