Saturday, January 11, 2025

Latest Posts

चांदिवाल आयोगाचा अहवाल जाहीर करा – अनिल देशमुख

| TOR News Network |

Anil Deshmukh Latest New : चांदीवाल आयोगाने ‘क्लिन चिट’ हा शब्द आपल्या चौकशी अहवालात वापरला नसला तरी मला दोषी धरले नाही. (Anil Deshmukh on chandiwal aayog) मात्र, भाजप नेते वारंवार आपण दोषी असल्याचे सांगून दिशाभूल करीत असल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.(Former HM Anil Deshmukh)

चांदीवाल आयोगाचा अहवाल १ हजार ४०० पानांचा आहे. तो जनतेसमोर आणावा यासाठी आपण वारंवार  महायुती सरकारकडे मागणी केली. त्याकरिता न्यायालयात सुद्धा गेल्याचे देशमुख यांनी सांगितले. निवृत्त न्यायाधीश चांदीवाल यांनी माझ्यावरील आरोपाची अकरा महिने चौकशी केली. त्यांनी अनेकांचे बयाण नोंदविले.  अहवालात मी कोठेही दोषी  नाही. माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचे पुरावे त्यांना मिळाले  नाही. ज्या परमबीर सिंग यांना सहा वेळा समन्स काढून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. अटक वॉरंट काढण्यात आल्यानंतर ते उपस्थित झाले.(Anil Deshmukh on parmbir singh) त्यांनीसुद्धा कुठलेच पुरावे दिले नाहीत. केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याचे त्यांनी आयोगाला सांगितले.  सचिन वाझे याने आयोगासमोर जवाबात आपण कधीही बार मालकाकडून पैसे गोळा करण्यासाठी सांगितले नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. (anil deshmukh on sachin vaze) मुंबई उच्च न्यायालयात माझ्यावरील आरोपाची केस सात महिने चालली. उच्च न्यायालयानेही पुरावे नाही नसल्याचे सांगून मला दोषी दिसत नसल्याचे म्हटले असल्याचे ते म्हणाले.  सध्या विधानसभेची निवडणूक सुरू असल्याने पुन्हा हा विषय उकरून काढला जात आहे. निवडणुकीसाठी भाजप राजकारण करीत असल्याचे देशमुख म्हणाले.

Latest Posts

Don't Miss