Saturday, January 18, 2025

Latest Posts

 केजरीवाल मद्याच्या नशेतून आलेल्या पैशांच्या नशेत बुडाले

Theonlinereporter.com – May 14, 2024 

Anna Hazare Latest News : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. (Anna Hazare cast vote) यानंतर लोकसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस आणि विरोधकांकडून होत असलेल्या आरोपावर अण्णा हजारे यांनी उत्तर दिले. प्रसारमाध्यमांशी बोलताना अण्णा हजारे यांनी अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. (Anna Hazare to media after voting)

यावेळी बोलताना अण्णा हजारे म्हणालेत कोणत्याही सरकारने किंवा पक्षाने संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देश पेटेल. आपले संविधान परिपूर्ण आहे. (Anna Hazare on constitution) ते बदलण्याची गरज आहे का? भारताचे संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान आहे. त्यात कोणीही बदल करण्याचा प्रयत्न करू नये, असे अण्णा हजारे यांनी स्पष्टच सांगितले.

देश मजबूत करायचा असेल तर मतदान केले पाहिजे, चारित्र्यवानांच्या हातात देश देण्याची गरज आहे. अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. (Anna Hazare on Arvind kejriwal) केजरीवाल मद्याच्या नशेतून आलेल्या पैशांच्या नशेत बुडाले आहेत. मी अरविंदला अनेक वेळा सांगितले, चारित्र सांभाळा, विचार शुद्ध ठेवा. परंतु मद्याचा पैसा मिळताच त्यात केजरीवाल तुडंब बुडाले आहे.(Anna hazare slams kejriwal)

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे यांनी पुन्हा एकदा महायुती म्हणजेच एनडीएकडून निवडणूक लढवली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून नीलेश लंके यांना लोकसभेचे उमेदवार करण्यात आले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या लोकसभेच्या जागेकडे लागले आहे.(Ahmednagar lok sabha news)

Latest Posts

Don't Miss