Saturday, January 11, 2025

Latest Posts

अंकिता पाटील यांचा थेट अजित पवारांवर निशाणा

त्यांनी आमची फसवणूक केली :  इंदापुरच्या जागेवर ठाम

| TOR News Network | Ankita Patil On Ajit Pawar : लोकसभेच्या जागेसाठी आता सर्व पक्षांमध्ये उमेदवारांची रस्सीखेच सुरु आहे. अनेक संभाव्य उमेदवार पक्षात आपली पकड पक्की करण्यासाठी धडपड करत आहे. अशात इंदापुरच्या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात खटके उडत आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी कन्या अंकिता पाटील यांनी इंदापुरच्या जागेवर आपण ठाम असल्याचे सांगत अजित पवार यांच्यावर निशाना साधला आहे. (Ankita Patil targeted Ajit Pawar) तर अजित पवार दत्ता भरणेसाठी सकारात्मक आहेत. (Ankita Patil For Indapur Loksabha)

पवार-पाटील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.त्यांनी आमची फसवणूक केली, आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मागच्या तिनही वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवला, त्यामुळे यावेळी जो कोणी उमेदवार असेल ते आमचं विधानसभेला काम करणार असतील तर लोकसभेला आम्ही त्यांच काम करू, असं अंकिता पाटील म्हणाल्या आहेत.

सध्या अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे महायुतीमध्ये आहेत. मात्र, पवार-पाटील वाद हा सर्वश्रूत आहे.(Dispute between Pawar Patil) या दोन घराण्यांमधील वाद हा आत्ताचा नाही तर शरद पवार आणि शंकरराव पाटलांपासूनचा आहे

बारामती लोकसभेला त्या मैदानात उतरणार

आता पवार- पाटील घराण्यच्या या वादात तिसरी पिढी सुद्धा उतरलीये. ती म्हणजे अंकिता पाटील आणि राजवर्धन पाटील. काही दिवसांपासून अंकिता पाटील या मैदानात सक्रिय झाल्यात. बारामती लोकसभेला त्या मैदानात उतरणार अशी चर्चाही होती. निर्धार…बारामती भाजपमय करण्याचा! ही त्यांची सोशल मिडीया पोस्टही चांगलीच चर्चेत आली होती.बारामती मतदारसंघात त्या फिरताना आणि लोकांच्या तरुणांच्या गाठीभेटी घेताना त्या पहायला मिळाल्या होत्या. पण या लोकभेवर अजित पवारांनी दावा केलाय. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना या ठिकाणी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामती लोकसभेवर अंकिता पाटलांनी पकड ढिली केली. पण इंदापुरच्या जागेवर अंकिता पाटील ठाम आहेत.

बारामतीत लोकसभेसाठी पवार कुटुंबातील दोन महिला आमने सामने 

दत्ता भरणेंसाठी पवारांची फिल्डींग

ते आमचं विधानसभेला काम करणार असतील तर लोकसभेला आम्ही त्यांच काम करू असं अंकिता पाटील म्हणाल्यात. तर राजवर्धन पाटील यांनी देखील २०२४ ला विधानसभा निवडणूक आम्ही लढणार असल्याचं जाहीर केलंय. पण अजित पवारांनी याठिकाणी दत्ता भरणेंसाठी आधीच फिल्डींग लावलीये. त्यामुळे जेव्हा अंकिता पाटलांनी अजित पवारांवर हा हल्लाबोल केला तेव्हा अजित पवारांनी त्यावर फार बोलणं टाळलं.

पवार म्हणाले आम्ही फडणवीस यांच्याशी चर्चा करु

नवीन जनरेशन आहे त्यामुळे यावर आम्ही फडणवीस हर्षवर्धन पाटलांशी बोलू असं अजित पवार म्हणाले. एकप्रकारे इंदापुरचा दावा अजित पवार सोडताना दिसत नाहीयेत. त्यामुळे आगामी काळात काय होतंय. हर्षवर्धन पाटील इंदापुरचा दावा सोडणार का? की कायम ठेवणार? आणि अजित पवार यावर काय मार्ग शोधणार हे पाहणं महत्वाच ठरेल.

Latest Posts

Don't Miss