Saturday, January 11, 2025

Latest Posts

केदारांच्या धाकामुळे रोखठोक नानाही सौम्य

| TOR News Network |

Nana Patole Latest News :  उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे यांच्या विरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक (Rajendra mulak ramtek) यांनी बंडखोरी केली. असे असतानाही त्यांना माजी मंत्री सुनील केदार खुलेआम साझ देत आहेत.त्यामुळे याची जोरदार चर्चा नागपूर जिल्ह्यात सुरू आहे. (Sunli Kedar Latest News) काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडेही या संदर्भात तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र याची कोणी दखल घेतलेली नाही. केदारांचा धाकामुळे कुठल्याही मुद्यावर रोखठोक बोलणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा रामटेकच्या बंडखोरीवर बोलण्यास आणि प्रतिक्रिया देण्यास टाळले असल्याचे दिसते. यावर त्यांनी सौम्य प्रतिक्रीया दिली. (Nana Patole on Ramtek)

ते म्हणाले, रामटेकमधील घडामोंडीची माहिती मागतिली आहे. महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडूण यावे ही आमची भूमिका आहे. मुळक यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे कोण कोण नेते फिरत आहेत याची चौकशी केल्यानंतरच प्रतिक्रिया देण्यात येईल एवढे मोजके शब्द वापरून पटोले यांनी केदार आणि रामटेकेच खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यावर बोलणे टाळले. (Nana Patole on sunil kedar)

लोकसभेच्या निवडणुकीतही काँग्रेस आणि नाना पटोले यांनी उमेदवार ठरवण्याचा आणि निवडण्याचा अधिकार केदार यांना दिला होता. येथील उमेदवार बदलला तर एकाही काँग्रेस नेत्याने त्यावर भाष्य केले नव्हते. विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणेही टाळले होते. सावनरेमध्ये केदार सांगतील तो उमेदवार असे अधिकृत पत्रच काँग्रेसने काढले होते. नागपूर ग्रामीणमधील उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेत केदारांशिवाय कोणार हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता. केदारांनी महविकास आघाडीच्या विरोधात जाऊन हिंगणा आणि उमरडे विधानसभा मतमदारसंघात त्यांच्या समर्थकांना उमेदवारी दाखल करण्यास सांगितले होते. हिंगण्यामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश बंग यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यास दबाव टाकला होता. रामटेकमध्ये त्यांनी उघडपणे महाविकास आघाडीच्या विरोधात बंड केले पुकारले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उद्धव सेनेचे उमेदवार विशाल बरबटे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. नाना पटोले आणि काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांच्याकडून त्यांनी कारवाईची अपेक्षा व्यक्त केली होती. एरवी कोणावरही व कुठल्याही मुद्यावर रोखठोक बोलणारे नाना पटोले यांनी केदारांबाबत सौम्य धोरण अवलंबल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Latest Posts

Don't Miss