Sunday, January 12, 2025

Latest Posts

नवे युद्ध :  अमेरिकेचा ‘या’ देशात घुसून एअर स्ट्राइक

America Airstrike Yemen : जगात सध्या दोन युद्ध आधीपासूनच सुरु आहेत. पहिल युद्ध रशिया-युक्रेनमध्ये लढल जातय. दुसर युद्ध इस्रायल आणि हमासमध्ये सुरु आहे. ही दोन युद्ध सुरु असताना नव्या वर्षात आत तिसऱ्या युद्धाला तोंड फुटलय. अमेरिकेने थेट अॅक्शन घेत मोठा एअर स्ट्राईक केलाय. अमेरिकेने लाल सागरात दादागिरी करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवलाय. महत्त्वाच म्हणजे अमेरिकेने ब्रिटनच्या साथीने मिळून ही कारवाई केलीय. (America Airstrike Houthi-controlled areas of Yemen)

लाल सागरात दहशत निर्माण करणाऱ्या हुती बंडखोरांच्या ठिकाणांवर अमेरिका-ब्रिटनने मिळून हवाई हल्ले केले आहेत. लाल सागरात हुती बंडखोर अमेरिका-ब्रिटनच्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करत होते. गुरुवारी सुद्धा त्यांनी हल्ला केला होता. येमेनमध्ये हुती बंडखोरांची ठिकाण आहेत. तिथे अमेरिका आणि ब्रिटनने मिळून मोठा हवाई हल्ला केलाय. हवाई हल्ल्यानंतर येमेनच्या अनेक शहरात बॉम्बस्फोटाचे आवाज ऐकू येत होते. हुती बंडखोरांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलय.

राजधानी सनासह अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत. अमेरिका आणि ब्रिटनच्या हवाई हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय. यात आगीच्या ज्वाळा आणि धूराचा लोट उठताना दिसतोय. अमेरिकेच्या या हल्ल्यात येमेनच मोठ नुकसान झाल्याची माहिती आहे. अमेरिका आणि ब्रिटनच्या या संयुक्त कारवाईनंतर हुती बंडखोर सुद्धा मोठा हल्ला करु शकतात. हुती बंडखोर ही इराणने पोसलेली संघटना आहे. इस्रायल-हमास युद्धात हुती बंडखोर हमासच्या बाजूने आहेत. इस्रायलने हल्ले रोखावेत, यासाठी त्यांच्याकडून लाल सागरात इस्रायलच्या समर्थक देशांच्या जहाजांवर हल्ले सुरु होते. हुती बंडखोरांना अमेरिकेकडून बऱ्याच दिवसांपासून इशारे दिले जात होते. अखेर अमेरिकेने तडक कारवाईच केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या कारवाईनंतर स्टेटमेंट दिलय. “आज माझ्या आदेशावरुन अमेरिकन सैन्य दलाने यूनायटेड किंगडमसोबत मिळून ऑस्ट्रेलिया, बहरीन, कॅनडा आणि नेदरलँडच्या समर्थनाने यमेनेमध्ये अनेक ठिकाणी यशस्वी हल्ले केले” लाल सागरात हुती बंडखोरांनी जे हल्ले केले, त्याला हे उत्तर असल्याच अमेरिकेने स्पष्ट केलय. लाल सागरात हुती बंडखोरांनी आतापर्यंत 27 हल्ले केले आहेत. यात 50 पेक्षा जास्त देशांना त्रास झालाय. लाल सागरात होणाऱ्या या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी 2 हजारपेक्षा अधिक जहाजांना हजारो मैल लांबून प्रवास करावा लागतोय.

Latest Posts

Don't Miss