Saturday, January 18, 2025

Latest Posts

युवा संघर्ष यात्रेचा फायदा कोणाला?

पक्ष बांधणीला, युवकांना की खुद्द रोहित पवारांना

युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आमदार रोहित पवार (Mla Rohit Pawar Yuva Sangharsh Yatra) यांनी युवा जोडोच्या संकल्पनेची जणू मूठ बांधली आहे.त्यांनी यात्रा काढून बेराजगारी,तरुणांचे प्रश्न,शिक्षणाचे खाजकीकरण,नोकर भरती अशा युवकांच्या समस्येला गळा भेट दिली आहे.(Whats the motto of Yuva Sangharsh Yatra) मात्र या यात्रेचा नेमका फायदा कोणाला ? पक्ष बांधणीला,युवकांना की खुद्द रोहित पवारांना….

युवकांचे विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला पुण्यातून प्रारंभ झाला.ही पायदळ यात्रा ८०० किमीची असून याचा समारोप नागपूरात होणार आहे.रोहित पवार एक असे आमदार आहेत ज्यांनी आपल्या आमदारकीच्या पहिल्याच टर्म मध्ये युवकांच्या जिव्हाळ्यांच्या प्रश्नांना घेऊन यात्रा काढली आहे.राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर बहूतांश आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे वळले आहेत.त्यामुळे शरद पवार यांच्या गटात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.पुढे लोकसभा,विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत.त्यामुळे या यात्रेच्या माध्यमातून पक्षाला बळकट करण्याचा प्रयत्न रोहित पवारांचा तर नाही ना असा ही तर्क राजकिय पंडितांकडून लावल्या जात आहे.त्या शिवाय नोकर भरती आणि बेराजगारी युवकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.त्यामुळे यात्रेच्या माध्यमातून त्यांनीही जोडण्याचा नक्कीच प्रयत्न रोहित पवार यांचा असेल.रोहित पवार स्वत:ला महाराष्ट्रातलं नेतृत्व म्हणून प्रस्थापित करण्याचा नक्कीच प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून करत आहेत अशी चर्चाही सुरु झाली आहे.मात्र अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीत असलेले नेते ते मान्य करतील का,त्यांना सहज स्वीकारतील का हा प्रश्न मात्र कायम आहे.

पदयात्रा बनले नवे समीकरण

कॅंग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशात मोठा प्रतिसाद मिळाला होता.या यात्रेमुळे कॅंग्रेसपक्षाला उभारी मिळाली.पक्षात नवचैतन्य मिळाले.त्यानंतर दक्षिणेतील स्टॅलिन याच्या यात्रेलाही मोठा प्रतिसाद लाभला होता.त्यात पाश्वभूमीवर आखल्या गेली असल्याचे नाकारता येणार नाही.या पदयात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी एकाच डगडात तिन शिकार करत असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे पदयात्रा आणि राजकारण हे जणू नवे समीकरण बनले आहे.

समाज माध्यमांच्या पलिकडे

रोहित पवार राज्यातील इतर युवा आमदारांपेक्षा अधिक प्रसार माध्यमांमध्ये झळकत असतात.राज्यात कोणतीही छोटी मोठी घडामोड घडली की रोहित पवार ट्विटर व समाज माध्यमांवर व्यक्त होताना दिसतात.या माध्यातून ते सरकारच्या मंत्र्यांसोबतच विरोधकांवर वार करत असतात.मात्र आता समाज माध्यम बाजूला ठेवत रोहित पवार या यात्रेच्या माध्यसातून थेट जनतेत व्यक्त होत आहेत.याचा कितपत फायदा होणार हे वेळत ठरवणार आहे.

Latest Posts

Don't Miss