आमदार आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वार
Aditya Thackeray On Cm Eknath Shinde: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरच राडा झाला.दोन्ही गट समोरासमोर येताच घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यावर आता आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त करत त्यांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत असे वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार केला आहे. (Mla Aaditya Thackeray Got Angry On CM Eknath Shinde Group At Balasaheb Memorial Place)
या घडलेल्या प्रकारावर आदित्य ठाकरे म्हणाले ही एक दुर्दैवी घटना आहे.ज्या सरकारने छत्रपती शिवरायांच्या मूर्ती असलेल्या शाखेवर हातोडा मारला, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असलेला बॅनर फाडल्याच्या गोष्टी केल्या आहेत त्यांना स्मृती स्थळावर जाण्याचा अधिकार काय?महाराष्ट्र या सगळ्यांनाच चांगलं उत्तर देणार आहे. निवडणुका लागूदेत त्यांना उत्तर मिळेल. अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना सुनावलं आहे. कारण जी गद्दार गँग आहे, जे घाबरले आहेत जे बाप चोरत पक्ष चोरणारे लोक आहेत, जे गुजरात आणि गुवाहाटीला पळून गेले त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही. आधी त्यांचा फोटो वापरुन, आमचा पक्ष वापरून, नाव वापरुन स्वतःसाठी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांचे प्रश्न तसेच भिजत पडले आहेत. नवी मुंबई मेट्रो सुरु झालेली नाही. डिलायल रस्ता सुरु झालेला नाही, बिल्डर पालकमंत्र्यांकडे वेळ नसावा. जनतेकडे लक्ष द्यायचं नाही. महाराष्ट्रात आल्यानंतर दंगली घडवायच्या, वातावरण बिघडवायचं, उद्योग गुजरातला धाडायचे हे सगळं मिंधे सरकारमध्ये सुरु आहे.” असंही आदित्य ठाकरे म्हणाले. शिवतीर्थावर पोहोचल्यावर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकमेकांकडे पाहून घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीचं मोठ्या राड्यात रुपांतर झालं. शिवतीर्थावर शिवसैनिकांनी एकमेकांना धक्काबुक्कीदेखील केली. शिवाजी पार्क परिसरात तणाव वाढू लागल्याने अखेर मुंबई पोलिसांचं एक पथक शिवतीर्थावर दाखल झालं होतं.या घडलेल्या प्रकारावरुन आता एकनाथ शिंदे गट आणि उघ्दव बाळासाहेब गटाकडून एकमेकांवर शाब्दिक प्रहार केला जात आहे.