Sunday, November 17, 2024

Latest Posts

भाजपच्या बालेकिल्ल्यात पवारांची खेळी : अमर काळे यांच्या एंट्रीने वर्धेत तगडी फाईट

| TOR News Network | Amar Kale Latest News : काँग्रेस नेते व आर्वी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अमर काळे यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) मध्ये प्रवेश केला. ते आता वर्धेतून लोकसभा लढवणार आहेत. सलग तिसऱ्यांदा ही जागा जिंकण्यासाठी सज्ज असलेल्या भाजपच्या रामदास तडस यांचा मार्ग काळे यांच्या उमेदवारीमुळे कठिण झाला आहे. (Amar kale to contest wardha lok sabha from Sharad pawar Ncp)

जागावाटपात शरद पवार यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडून मागून घेतला. विदर्भात पक्षाचे अस्तित्व राखण्यासाठी ही जागा निवडली. वर्धा लोकसभा मतदारसंघात अमरावती जिल्हातील मोर्शी आणि धामनगाव रेल्वे या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे फारशे अस्तित्व नसल्यामुळे अमरावतीचे सहकार नेते, माजी आमदार हर्षवर्धन देशमुख यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती.(Harshvardhan Deshmukh) मात्र, त्यांचे वाढते वय आणि वर्ध्याबाहेरचे असल्यामुळे देशमुख यांची उमेदवारी कमजोर समजली जात होती. मात्र, राजकारणाच्या मैदानात डाव टाकण्यात वस्ताद असलेल्या शरद पवार यांनी अमर काळे यांना हेरले. मुंबईत बोलावून त्यांना तिकिटाची ऑफर दिली. (Sharad pawar offer amar kale) आर्वी मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधित्व केलेल्या अमर काळे यांची जिल्ह्यात प्रतिमा अतिशय चांगली आहे. युवा, प्रामाणिक आणि विचारधारेशी समर्पित असणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे

तेली विरुद्ध कुणबी लढत

वर्ध्यात तेली, कुणबी लोकसंख्या प्रत्येकी साडे तीन लाखांच्या घरात आहे. रामदास तडस हे तेली समाजाचे मोठे नेते आहेत. त्याखालोखाल दलित, आदिवासी, मुस्लिम लोकसंख्या आहे. माळी आणि भोयर पवार समाजाची मिळून ९ टक्के लोकसंख्या आहे. अमर काळे यांच्यामुळे यंदाची लढत तेली विरुद्ध कुणबी अशी होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात शरद पवार यांचा शब्द प्रमाण मानणारे लोक अजूनही आहेत. त्याचा फायदा अमर काळे यांना होईल. (Sharad pawar)

भाजपचा बालेकिल्ला

महात्मा गांधी यांच्या वास्तव्यामुळे पावन झालेला आणि काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यात २०१४ नंतर भाजपने वेगाने हात-पाय पसरले. २०१४ मध्ये मोदी लाटेत, मूळचे काँग्रेसचे असलेल्या रामदास तडस यांनी भाजपच्या तिकिटावर दत्ता मेघे यांचा मुलगा सागर मेघे यांना २ लाखांच्यावर फरकाने पराभूत केले. (BJP Ramdas Tadas from wardha) २०१९ मध्ये ते आरामशीर निवडून आले. तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वर्ध्याचे पालकमंत्रीपद होते. त्यामुळे जिल्ह्यात विकास निधी आला, त्यातून भाजपची संघटन ताकद वाढली. हा जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला आहे.

Latest Posts

Don't Miss