Thursday, January 16, 2025

Latest Posts

धक्का बसेल ! आलु-वांग्याची भाजी ठरली जगातील खराब भाजी

Aloo Baingan Vegetable Ranked Worst : जेवणाच्या ताटात आलु-वांग्याची भाजी असली तर भारतीयांचा तर विषयच संपला. त्याच्या जोडीला मग दुसरा कोणताच भाजी नको.महाराष्ट्रात तर अनेक कार्यक्रमात अथवा समारंभात प्रामुख्याने ही भाजी ठेवली जाते. मात्र याच भाजी संदर्भात आता एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बहुतांश लोकांना आवडणारी आलु-वांग्याची भाजी जगातील सर्वात खराब भाजी ठरली आहे. (Famous Indian Vegetable Aloo Baigan in the List of Worlds Top 100 Bad Foods)

भारताच्या विविध ठिकाणी खूप चवदार, चमचमीत खाद्यपदार्थ चाखायला मिळतात. प्रत्येक राज्य आणि शहराचा स्वत:चा असा एक खास खाद्यपदार्थ आहे; ज्याच्या नावे ते राज्य किंवा शहरही ओळखले जाते. देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्वत्र विविध खाद्यपदार्थांमध्ये काहीतरी वेगळी खासियत पाहायला मिळते. त्यात कुठे अतिशय साधे जेवण, तर कुठे मसालेदार खाद्यपदार्थांना पसंती दिली जाते. त्यामुळे देश-विदेशांतील लोक येथे येऊन विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची इच्छा व्यक्त करतात. भारतीय खाद्यपदार्थांची जगभरात अनेकदा प्रशंसा केली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की, जगातील १०० सर्वांत वाईट खाद्यपदार्थांच्या यादीत भारताच्या एका पदार्थाचा समावेश आहे. नुकतीच जगातील १०० सर्वांत वाईट खाद्यपदार्थांची यादी जाहीर झाली; त्यात बटाटा-वांग्याची भाजी जगातील सर्वांत वाईट पदार्थांच्या यादीत समाविष्ट झाली आहे. विशेष करुन महाराष्ट्रात ही भाजी आवडीने खाल्ली जाते.

अलीकडेच ‘टेस्ट अॅटलस’ नावाच्या ट्रॅव्हल गाईडने जगातील १०० सर्वांत वाईट पदार्थांची यादी जाहीर केली आहे. त्या यादीत भारतीय खाद्यपदार्थ वांगी-बटाट्याच्या भाजीला ६० व्या स्थानी ठेवण्यात आले आहे. वांगी-बटाट्याच्या भाजीला जगभरातून केवळ २.७ टक्के रेटिंग मिळाले आहे; जे खूपच कमी आहे. ही भाजी भारतात खूप लोकप्रिय आहे; पण परदेशी लोकांना तिची चव आवडली नाही. परदेशी लोकांसाठी भारतीय खाद्यपदार्थांची चव वेगळी वाटत असल्याचे या अहवालातून स्पष्ट होते.

पदार्थांना कसे दिले जाते रेटिंग?

सर्वप्रथम टेस्ट अॅटलसद्वारे जगभरात ऑनलाइन सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणातील सहभागींना १०० सर्वांत वाईट पदार्थांबद्दल त्यांचे मत देण्यास सांगितले जाते. त्यानंतर सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले जाते. प्रत्येक खाद्यपदार्थाला मिळालेले रेटिंग आणि टिप्पण्या लक्षात घेऊन संग्रहित स्कोअर तयार केला जातो.

Latest Posts

Don't Miss