Sunday, January 12, 2025

Latest Posts

मोठी बातमी : इव्हीएमवरच होणार मतदान, बॅलेट पेपरबाबतच्या सर्व याचिका फेटाळल्या

| TOR News Network | Supreme Court On Ballot Paper : इव्हीएम की बॅलेट पेपर या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून या बाबतच्या याचिकांवर सुनावणी सुरू होती. अखेर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला. (Supreme court discussion on ballot paper) यात मतदान आता इव्हीएमवरच होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हणटंले आहे.त्यामुळे आता बॅलेट पेपर इतिहास जमा होणार हे स्पष्ट झाले आहे.(Voting will be on Evm says supreme court)

इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) च्या मुद्द्यावरुन सुप्रीम कोर्टामध्ये (Evm hearing in Supreme Court) सुनावणी सुरु होती. इव्हीएममध्ये नोंद झालेल्या १०० टक्के मतांची व्हीव्हीपॅटमधील पावत्यांशी पडताळणी करुन पाहण्याची मागणी करण्यात आली होती.(voting demand on ballot paper) बॅलेट पेपरबाबतच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे EVM मशिनवरतीच निवडणुका होणार आहेत, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. (Supreme court result on ballot paper)

बॅलेट पेपरबाबतच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे EVM मशिनवरतीच निवडणुका होणार आहेत, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.

न्यायालयाने आधी सांगितलं होतं की, बॅलेट पेपरवर निवडणुका घेणे अवघड आहे, (Difficult to take voting on ballot paper) EVM मशीन आणि VVPAT यांच्या पडताळणीची मागणी केली होती. त्याबाबत निर्देश देऊन ते सुधारण्याची प्रक्रिया राबवली जाऊ शकते.

सर्वोच्च न्यायालयाने दोन निर्देश दिले आहेत – पहिला निर्देश म्हणजे चिन्ह लोडिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सिम्बॉल लोडिंग युनिट्स (SLU) सील केले जावे आणि ते किमान 45 दिवस ते ठेवावेत. याशिवाय दुसरा निर्देश म्हणजे अभियंत्यांची टीम मायक्रोकंट्रोलर युनिटची जुनी मेमरी तपासेल.

याआधी, दोन दिवसांच्या सलग सुनावणीनंतर खंडपीठाने याचिकांवरील निर्णय १८ एप्रिल रोजी राखून ठेवला होता. मात्र, बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा नोंदवले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून काही गोष्टींबाबत स्पष्टीकरण मागवले होते. त्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता.

Latest Posts

Don't Miss