Saturday, January 11, 2025

Latest Posts

आकाश दीपचा रांचीत डंका…पदार्पणात जिंकले भारतीयांचे मन

| TOR News Network | Akash Deep Debut : आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाज आकाश दीपने भारतीयांचे मने जिंकली आहेत.त्याने रांची येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात घातक गोलंदाजी करत इंग्लंडच्या तिन्ही सलामीवीरांना बाद करुन भारताला मोठा दिलासा दिला आहे. (Akash Deep Dangerous Bowling)

भारत आणि इंग्लंड यांच्यात रांची येथे आजपासून चौथा कसोटी सामना सुरू झाला आहे.(India vs England 4th Test)  या कसोटी सामन्यात आकाश दीप यानं पदार्पण केलं आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय आकाश दीप यानं सपशेल चुकीचा ठरवला. त्यानं इंग्लंडचे सुरुवातीचे तिन्ही फलंदाज तंबूत धाडले.(Akash Deep took 3 Wickets in debut match)

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. त्यातील चौथा कसोटी सामना रांचीमध्ये आजपासून सुरू झाला आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. (India England Test Match Ranchi) भारताकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या आकाश दीप याने इंग्लंडचे तिन्ही फलंदाज माघारी धाडले आहेत.

इंग्लंडच्या डावाची सुरुवात जॅक क्राउली आणि बेन डकेट या दोघांनी केली. अत्यंत सावधपणे खेळणाऱ्या डकेटला ११ धावांवर आकाश दीपने बाद केले. ध्रुव जुरेल याने त्याचा झेल घेतला. डकेट बाद झाला त्यावेळी इंग्लंडच्या ४७ धावा होत्या. त्यानंतर आलेल्या ओली पोपला आकाश दीपनेच शून्यावर बाद केले.सलामीचा फलंदाज आणि अत्यंत सावधपणे खेळणाऱ्या क्राउलीचा आकाश दीपने त्रिफळा उडवला. ४२ धावा करून क्राउली बाद झाला.

राजकोट कसोटी (Rajkot Test) जिंकणाऱ्या भारतीय संघात रांची कसोटीत केवळ एक बदल पाहायला मिळाला. आकाश दीप याला या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. भारताकडून (Team India) कसोटी क्रिकेट खेळणारा तो ३१३ वा खेळाडू ठरला. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने आकाश दीपला टेस्ट कॅप दिली. २७ वर्षीय आकाश दीप मूळचा बिहारच्या डेहरी येथील राहणारा आहे. मात्र, तो बंगालकडून खेळतो.

भारतीय संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह नाही. त्यामुळे त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये आकाश दीपला संधी देण्यात आली. बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.

आकाश दीपची कामगिरी

आकाश दीप याने २०१९ मध्ये प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी २० मध्ये पदार्पण केले. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळतो. आतापर्यंत २०२२ आणि २०२३ या दोन मोसमात तो खेळतो. ७ सामन्यांत त्याने ६ गडी बाद केले आहेत.

Latest Posts

Don't Miss