Wednesday, January 15, 2025

Latest Posts

मोठ्या पवार साहेबांवरील टीकेनंतर अजित पवारांचा थेट इशारा

| TOR News Network |

Ajit Pawar Latest News : सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या आजारपणावरुन बोलत जे वक्तव्य केलं ते सगळ्यांनाच झोंबलं आणि महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटत आहेत. (Sadabhau khot on sharad pawar) शरद पवार यांचे पुतणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही हे वक्तव्य रुचलं नसून त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर कडाडून टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली असली , अजित पवार आणि इतर पवार कुटुंबात मतभेद झाले असले, अजित दादा गट महायुतीत सामील असला तरी शरद पवार यांच्यावरील वैयक्तिक पातळीवरील ही टीका मात्र अजित पवार यांना आवडलेली नाही.(Ajit Pawar On Sadabhau khot)

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अजित पवार यांनी एक पोस्ट शेअर करत सदाभाऊ खोत यांना कानपिचक्या दिल्या आहेत.(Ajit Pawar post on X) खोत यांचं हे वक्तव्य अत्यंत चुकीचं आणि निंदनीय आहे असे म्हणत अजित पवार यांनी त्यांना चांगलंच फटकारलं आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

 ‘ ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही’ अशा शब्दांत अजित पवार यांनी थेट इशाराच दिला आहे. (Ajit Pawar warning to sadabhau khot)

जतमधील महायुतीच्या सभेत बोलताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप आमदार सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना पातळी सोडली. शरद पवार यांच्या आजारपणावरुन वक्तव्य करताना “आता महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?”, असा खोचक सवाल खोत यांनी विचारला. “महाराष्ट्र बदलायचा आहे म्हणजे तुम्हाला कसला चेहरा पाहिजे?” असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं.

Latest Posts

Don't Miss