Sunday, January 12, 2025

Latest Posts

घरच्या या व्यक्तीवर अजित पवारांनी काढला पराभवाचा राग

| TOR News Network |

Baramati Latest News : महायुतीला लोकसभा निकालाने मोठा झटका बसला आहे. (Big shock to mahayuti in lok sabha) डॅमज कंट्रोल कसं करावं यासाठी डावेपच आखले जात आहे. मंथन होत आहे. बैठकांचं सत्रे सुरु आहेत.(Mahayuti meeting for damage control) महाविकासा आघाडीने मारलेली मुसंडी अनेक आमदारांसाठी अस्वस्थ करणारी आहे. राज्यात मोदी मॅजिकचा करिष्मा दिसला नाही. त्यातच बारामतीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे.(Latest News From Baramati)

बारामतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवारांनी युगेंद्र पवारांना बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदावरुन हटविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Ajit Dada Removed Yugendra Pawar From The Post Of President Of The Kustigir Association) युगेंद्र पवार बारामती कुस्ती संघाचे अध्यक्ष होते. त्यांचे कामही जोरदार होते. पण काल झालेल्या एका बैठकीला उपस्थित न राहिल्याने त्यांच्यावर ही कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे. तर निवडणूक संपताच युगेंद्र पवारांना हटवल्याने चर्चांना उधाण आले आहे.(Ajit Pawar Angry on yugendra Pawar) निकालाचा राग युगेंद्र पवार यांच्यावर निघाल्याची चर्चा होत आहे. (Ajit Pawar Angry With The Result)

याप्रकरणात युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Yugendra Pawar on Ajit Pawar) “मला काही सांगता येणार नाही. काही लोकांनी मला पण सांगितलं की परवा कुठेतरी एक मीटिंग झाली. पण माझ्या कानावर आले पण माझ्यापर्यंत कुठल्याही ऑफिशियल चैनल कडून काय अजून माझ्याकडून काय पत्र किंवा असं काय आलेलं नाही. तीन-चार वर्षांपासून कुस्ती संघाची जबाबदारी माझ्याकडे घेतली. त्याच्या आधी श्रीनिवास बापू ते बघत होते. चांगलं काम केलंय. तिथले पैलवान चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना सोयी सगळे सुविधा देऊ शकलो. दादांनी पण तिथे खूप मदत केली आहे. दादांनी पण तिथं आम्हाला इमारतीला मदत केली. त्यामुळे पैलवानांना प्रोत्साहन मिळाले.”(Ajit Dada Help us)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार हे चिरंजीव आहेत. त्यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बारामतीत कुस्ती स्पर्धेचं आयोजन केले होते. त्यावेळी शरद पवार आणि युगेंद्र यांचेही फोटो झळकले होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर हल्लोबोल केला होता.

Latest Posts

Don't Miss