Thursday, January 16, 2025

Latest Posts

जागावाटपा बाबात अजित पवारांनी सांगितला फॉर्म्युला

| TOR News Network |

Ajit Pawar Latest News :  सर्वच राजकीय पक्षांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. (Vidhansabha Election Latest News) निवडणुकीसाठी नेते मंडळी जोमाने तयारीला लागले आहेत. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) यांच्या सामना पाहायला मिळणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप जागावाटप निश्चित झाले नाही. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबतचा फॉर्म्युला सांगून टाकला आहे. (Mahayuti Seat Sharing Formula) यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच राज्यात निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू होईल. साधारण 20 सप्टेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(20 september election code of conduct) त्यातच आता अजित पवार यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

महायुतीच्या जागावाटपाबाबत अजित पवार म्हणाले की, आमच्या तीनही पक्षांकडे ज्या ज्या जागा आहेत त्या त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जातील.(All existing Seat will remain same) पण जर काही सिटींग जागा बदलायच्या असतील तर त्याही प्रकारची तयारी आणि मानसिकता तिन्ही पक्षांनी आणि मित्र पक्षांनी ठेवली आहे. आता लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिलेले आपल्या पाहण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा नवा अजेंडा तयार केला जात आहे का? असे विचारले असता अजित पवार म्हणाले की, (Ajit Pawar On Maratha Reservation) त्यांना जी भूमिका मांडायची आहे ती भूमिका ते मांडू शकतात. आम्हाला जे सांगायचे आहे ते आम्ही सांगू इच्छितो. आम्हाला कुणालाही नाराज करायचे नाही. सर्व घटकांना आम्हाला पुढे घेऊन जायचे आहे, असे त्यांनी म्हटले.

Latest Posts

Don't Miss