Thursday, January 16, 2025

Latest Posts

त्याच्या डोक्यात हवा घातलेली आहे की तू खासदार होशील

| TOR News Network | Ajit Pawar On Nilesh Lanke : सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे  आमदार निलेश लंके यांची जोरात चर्चा सुरु आहे. त्यांना अजित पवार गटाकडून लोकसभेची तिकीट मिळण्याची आशा होती मात्र भाजपने अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली. यामुळे ही जागा भाजपकडे गेली आहे.त्यामुळे आमदार निलेश लंके नाराज झाले आहेत. लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. आज म्हणजेच १४ मार्च रोजी दुपारी शरद पवारांच्या उपस्थित लंके पक्षप्रवेश करतील असं सांगितलं जात आहे. असं असतानाच आता थेट अजित पवारांनीच निलेश लंकेच्या पक्षांतरासंदर्भात भाष्य केलं आहे. (Nilesh lanke to join NCP Sharad pawar group)

अजित पवारांनी काय म्हणाले

राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. आज अजित पवारांच्या ७ सभा बारामती मदतारसंघात होणार आहेत. (Ajit pawar 7 rally in baramati today) याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळेस निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना निलेश लंके यांना जायचं असेल तर आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल, असं अजित पवार म्हणाले. “निलेश लंके जाऊ शकत नाही.(nilesh lank cant go in sharas pawar group) त्याला जायचं झालं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल.(He have to resign first) राजीनामा देऊन कोणाला कुठेही जाता येतं,” असं अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना अजित पवार यांनी, “वास्तविक निलेशला पक्षात मी घेतलं. निलेशला मनापासून आधार मी दिला. कालच माझ्याकडे तो आला होता. त्याला मी काही गोष्टी नीट समजावून सांगितल्या आहेत. परंतू काही लोकांनी त्याच्या डोक्यात हवा घातलेली आहे की तू खासदार होशील. वास्तविक तसं नाहीये,” असंही म्हटलं.

पक्षांतरासंदर्भात काय म्हणाले शरद पवार?

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी अहमदनगरच्या पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाबाबत भाष्य केलं. याआधी खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना महाविकास आघाडीत येऊन तुतारी घेऊन लोकसभा निवडणूक लढण्याच निमंत्रण दिल होतं.(We have invited lanke for loksabha) त्यानंतर निलेश लंके शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी पुण्यातील पत्रकार परिषेदत शरद पवारांनीही प्रतिक्रिया नोंदवली होती.

त्यांच्या निर्णयावरुन ते ठाम आहेत

“चर्चेला काही अर्थ नाही. एकदम अशी चर्चा का झाली. असे अनेक लोक आहेत. ही चर्चा मी तुमच्याकडून ऐकत आहे. किती संपर्कात आहे याबद्दल माहिती नाही कारण आम्ही त्या उद्योगात नाही. अनेक लोक असे आहेत की, ज्यांना हे योग्य वाटत नाही. त्यांनी आमच्यापासून दूर जाण्याचे निर्णय घेतले आहेत आणि त्यांच्या निर्णयावरुन ते ठाम आहेत. पण ते अस्वस्थ आहेत. (Nilesh lanke is not happy) कोण येणार आहे. त्याची माहिती द्या, माझ्या समोर उभं करा,” असं शरद पवार निलेश लंकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आलं असता म्हणाले होते.

Latest Posts

Don't Miss