Thursday, January 16, 2025

Latest Posts

बारामतीत अजित पवारांना धक्का: सख्खा पुतण्याची राजकारणात एन्ट्री

| TOR News Network | Baramati Politics News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना बारामतीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होण्याची शक्यता आहे. नणंद विरुद्ध भावजय असा सामना होऊ शकतो. पण आता पवार कुटुंबातच राजकीय फाटफूट झाल्याने बारामतीच्या कौल कुणाला? याकडे देशाच लक्ष लागलं आहे. म्हणून लोकसभा निवडणूक 2024 ची घोषणा होण्याआधी बारामती लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरु झाली आहे.(Big Shock To Ajit Pawar In Baramati)

बारामतीमध्ये शरद पवार यांना मानणारा जसा मोठा वर्ग आहे, तशी अजित पवार यांची सुद्धा ताकद आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची बारामतीमधील राजकीय ताकद किती? यावर शिक्कामोर्तब होणार आहे. नुकतच अजित पवार एका भाषणात म्हणाले होते की, “बारामतीत मला एकट पाडलं जाईल, कुटुंबातील कुणीही व्यक्ती माझ्यासोबत नसेल” आता बारामतीत तसच घडताना दिसतय. त्याची सुरुवात झाली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये काका-पुतण्याच नातं आहे.

राज्याच्या राजकारणात नव्या पवाराची एण्ट्री

सख्खा पुतण्या देऊ शकतो धक्का

महाराष्ट्राच्या राजकारणात पुतण्याने जसा आपल्या काकाला धक्का दिला, तसच बारामतीत अजित पवार यांना त्यांचा सख्खा पुतण्या धक्का देऊ शकतो. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत.( Ajit Pawar Nephew Yugendra Pawar) युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. युगेंद्र पवार हे बारामतीमधील शरद पवार यांच्या कार्यालयाला भेट देणार आहेत.(Yugendra Pawar to Meet Sharad Pawar) त्यावरुन युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या गटात सहभागी होणार, अशी राजकीय चर्चा रंगली आहे.(Yugendra Pawar likely to join Sharad Pawar) युगेंद्र पवार यांच्याविषयी शरद पवार म्हणाले की, ते अमेरिकेतून शिकून भारतात आले आहेत. युगेंद्र पवार हे बारामतीत काही संघटनाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा मोठा जनसंर्पक आहे. युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांना साथ दिल्यास तो अजित पवार यांच्यासाठी एक धक्का असेल.

Latest Posts

Don't Miss