अजित पवार इंडिया आघाडीवर कडाडले
Ajit Pawar on Election 2023: नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. जागतिक पातळीवर भारताचा नावलौकिक वाढला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये नागरिकांनी कौल दिला आहे.मात्र इंडिया आघाडीचे नेते ईव्हीएमध्ये घोटाळा झाल्याचं बोलायला लागले आहेत.(DCM Ajit Pawar On India Aaghadi) यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू आहे. तर, तेलंगणात भारत राष्ट्र समितीला पराभवाचा सामना करावा लागला असून काँग्रेसने जोरदार मुसंडी मारला आहे. पण, राजस्थान आणि छत्तीसगडसारखी राज्ये काँग्रेसच्या हातून निसटली आहेत. तेलंगणात रेवंथ रेड्डी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते. पण, काही कारणास्तव ते काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे तेलंगणातील चित्र बदलेले दिसत आहे. के. चंद्रशेखर राव यांनी खूप जाहिरातबाजी केली. पण, लोकांनी त्यांना नाकारलं, असंही अजित पवारांनी म्हटलं. हा निकाल अनपेक्षित लागला नाही. मी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. तेव्हा अमित शाहांनी निकाल चांगला लागेल असं सांगितलं होतं. पण, काहीवेळा नको तेवढा आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा टोला अजित पवारांनी काँग्रेसला लगावला आहे.आता इंडिया आघाडीतील नेते ईव्हीएमध्ये घोटाळा झाल्याचं बोलायला लागले, तर आश्चर्य वाटायला नको. मग, तेलंगणात वेगळा निकाल कसा काय लागला? जनतेनं मोदी सरकारला पाठिंबा आहे. पंजाबात आपचं सरकार आलं. दिल्लीतही दुसऱ्यांदा आप निवडून आली. त्यांनीही ईव्हीएमध्ये घोटाळा केला का ? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.