Saturday, January 18, 2025

Latest Posts

भाजपच्या यादीने गणित बिघडवले, हा आमदार शरद पवारांच्या पक्षाच्या वाटेवर 

| TOR News Network | Bjp Lok Sabha List Effect : काल संध्याकाळी भारतीय जनता पक्षाने  लोकसभा निवडणुकी संदर्भात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवार आहेत. या यादीनंतर काही ठिकाणी बंडखोरीचे सूर उमटत आहेत.काही नाराज समर्थक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.मात्र  भाजपच्या या यादीचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर झाला आहे. भाजपने अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे ही जागा भाजपकडे गेली आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके नाराज झाले आहे. त्यांची वाटचाल शरद पवार गटाकडे सुरु झाली आहे. (Ajit Pawar Mla On Way To Sharad Pawar NCP )

शरद पवार यांच्या उपस्थित प्रवेश

निलेश लंके यांना लोकसभा निवडणूक लढवयाची आहे. काही दिवसांपूर्वी खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना शरद पवार गटाकडून लोकसभेची ऑफर दिली होती. त्यानंतर निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली होती. परंतु निलेश लंके यांनी नकार दिला होता. आता शरद पवार यांच्या उपस्थित त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.(Nilesh Lanke to join Sharad Pawar Group) निलेश लंके यांचे ‘मी अनुभवलेले कोव्हीड’ या पुस्तकाचे प्रकाशन आज होणार आहे. हे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर दक्षिणची उमेदवारी मिळण्याची शक्यता

आमदार निलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. (Nilesh Lanke In Loksabha Circle) काल भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होताच त्यांनी शरद पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज या प्रवेशासोबतच त्यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देखील मिळण्याची शक्यता आहे.मागील अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होत्या.

राष्ट्रवादीचे चार तर भाजपचे २ आमदार

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात अहमदनगर शहर,श्रीगोंदा, पारनेर ,शेवगाव- पाथर्डी कर्जत- जामखेड, राहुरी (काही भाग) असे विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदार संघात राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत. भाजपचे २ आहेत. यामुळे या मतदार संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून येते. परंतु राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर दोन आमदार अजित पवार यांच्यासोबत तर दोन आमदार शरद पवार यांच्याकडे गेले आहेत.

Latest Posts

Don't Miss