Saturday, January 11, 2025

Latest Posts

अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे तुतारी हाती घेणार

| TOR News Network |

Sharad Pawar Latest News : माढा विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीमध्ये आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. (Madha Mla Baban Shinde) मात्र लवकरच राज्यातील विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच माढा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन नवे संकेत दिले आहेत. (Mla Baban Shinde to join Sharad Pawar NCP)

 

आजवर माढा मतदारसंघावर आमदार बबनराव शिंदे यांचे वर्चस्व राहिलेले असून, सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत राज्यात अजित पवार गट राष्ट्रवादी- सेना व भाजप युतीची झालेली वाताहत पाहता कदाचित आमदार शिंदे हे शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Mla Baban Shinde to Left Ajit Pawar NCP) सलग सहा वेळा या मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार शिंदे यांचे या मतदारसंघातील विकास कामे महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने पुन्हा एकदा ते शरद पवार यांच्या सोबत जाण्याची शक्यता वर्तवली आहे.

राज्यात भाजप व महायुतीसाठी पोषक वातावरण नसल्याचे राजकीय तज्ञांचे म्हणणे असले तरी आमदार बबन शिंदे हे शरद पवार यांच्यासोबत गेल्यास त्यांच्यासाठी माळ्याचे गणित अतिशय सोपे असणार आहे. त्यामुळे बाकी सर्वच इच्छुकांना यामुळे हिरमोड होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र आठवड्याभरात याबाबत अधिक स्पष्टीकरण येणार असल्याने बबन शिंदे काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचे तसेच माढा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.

Latest Posts

Don't Miss