Saturday, January 18, 2025

Latest Posts

अजित पवारांना धक्का देत नेत्यांची मोठी टीम शरद पवार गटात प्रवेश करणार

| TOR News Network |

Sharad Pawar Latest News : पुण्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.(Pimpri-Chinchwad NCP News) पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवार गटाच्या नेत्यांची मोठी टीम राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत.(Ajit Pawar Leaders to join Sharad Pawar Ncp) त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसणार आहे.(Shock to Ajit Pawar) या संपुर्ण घडामोडीवर आज शरद पवार यांनी दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. (Sharad Pawar Press Conference today) नेत्यांचा पक्ष प्रवेश झाल्यावर शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला तर महाराष्ट्राच्या जनतेने  महाविकास आघाडीच्या गळ्यात मोठा विजयाची माळ टाकली.(Bid Success to Mahavikas Aghadi in Loksabha) पण त्यानंतर राज्यातील राजकारणात मोठे बदल होऊ लागल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटातील काही कार्यकर्ते पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यासह १५ पेक्षा अधिक नगरसेवक आज शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. (shocking news to Ajit Pawar ) पुण्यातील शरद पवार यांच्या मोदी बागेतील निवासस्थानी हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

गेल्या 20-25 वर्षांपासून पिंपरी चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. पण लोकसभा निवडणुकीनंतर वातावरण बदलल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  भोसरी आणि चिंचवडमध्ये सध्या भाजपचे आमदार आहेत.(Bhosri And chinchwad seat to bjp) त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही याठिकाणी भाजपच्या उमेदवाराला संधी मिळू शकते, अशी शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजकीय भविष्याचा विचार करून हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या गटातील नेते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्या उपस्थितीत भोसरीचे माजी आमदार   विलास लांडे, स्थायी समितीचे मा.अध्यक्ष अजित गव्हाणे यांसह सर्व प्रमुख नगरसेवक आणि पदाधिकारी  शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

 

Latest Posts

Don't Miss