Monday, January 13, 2025

Latest Posts

विरोधकांपुढे हात जोडत अजित पवार म्हणालेत…

| TOR News Network |

Ajit Pawar Latest News : विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना केंद्रस्थानी आहे. सत्ताधारी या योजनेच्या माध्यमातून प्रचार करत आहेत. अशात या योजनेवरुन विरोधकांना सत्ताधाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे.(Opposition slams on ladki bahin yojana) त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक व्हिडीओ फेसबूकवर पोस्ट केला आहे.(Ajit pawar facebook video) त्यात त्यांनी लाडकी बहीण योजनेचे महत्व सांगताना विरोधकांना चांगलेच फटकारले.(Ajit pawar Speaks about ladki bahin yojana on facebook) लाडकी बहीणी बद्दल सांगताना ही योजना ‘मी’ कशी आणली हे त्यांनी सांगितले. शिवाय  ही योजना ‘मी’ बंद पडू देणार नाही हा दादाचा वादा असेही ते म्हणालेत. (Ajit pawar on ladki bahin yojana)

यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले) त्यांनी या व्हिडीओत विरोधकांना हात जोडले आहे.(Ajit pawar fold hands to opposition) मी विरोधकांना हात जोडून विनंती करतो, मला जी तुम्हाला शिविगाळ करायची आहे ते निश्चित करा पण लाडकी बहीण योजनेबाबत करोडो कुटुंबाची स्वप्न जोडलेली आहेत. त्या स्वप्नांची राखरांगोळी करू नका असे आवाहन त्यांनी केले आहे. या योजने बाबत विरोधक संभ्रम निर्माण करत आहेत. त्यांना ही योजना बंद करायची आहे.(opposition to shut down ladki bahin yojana) त्यांचे ते स्वप्न आहे. असे स्वप्न पाहाणाऱ्या विरोधकांना आगामी विधानसभा निवडणुकीत चांगला धडा शिकवा असे आवाहन त्यांनी महिला मतदारांना केले आहे. शिवाय काही झाले तरी हा दादा ही योजना बंद पडू देणार नाही असे ही त्यांनी सांगितले आहे. ऐवढेच नाही तर या योजनेची रक्कमही वाढवण्याचा आपलाय प्रयत्न राहील असेही ते म्हणाले.

अजित पवार असं ही म्हणतात अनेक बहीणींचे प्रेम आणि आशिर्वाद आपल्याला भेटले आहेत. त्यामुळे मी जगातील सर्वात भाग्यवान दादा आहे. यावेळचे रक्षाबंधन कधीही विसरणार नाही. जे प्रेम आणि ताकद मिळाली आहे त्यामुळे आपली जबाबदारी जास्त वाढली असल्याचे अजित पवार म्हणाले. त्यामुळे तुम्हाला बळ देण्यासाठी हा दादा कधीही कमी पडणार नाही हा या दादाचा वादा आहे असेही अजित पवार या व्हिडीओत सांगत आहेत. (Ajit pawar to ladki bahin on yojana) शिवाय विरोधक जी खोटी माहिती पसरवत आहेत त्याचा जाब बहीणींना विचारावा लागणार आहे.

बहीणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. त्यांना रक्षाबंधनाची ओवळणी दिली आहे. शिवाय त्यांना भाऊबीजही दिली आहे. त्यामुळे विरोधक हे भेदरले आहेत. ते घाबरले आहेत. त्यामुळेच ते खोटा प्रचार करत आहेत. बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. असं असलं तरी तुमचा हा दादा तुमच्या खात्यात पैसे जमा करत राहाणार आहे असेही ते म्हणाले. सरकार पुन्हा आले तर लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाढवण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही ते म्हणाले. त्याच बरोबर विरोधक ही योजना बंद करण्याचे बोलत आहेत. पण तुमच्या राखीची शपथ घेवून सांगतो ही योजना बंद पडू देणार नाही असे आश्वासन ही अजित पवार यांनी दिले. शिवाय विरोधकांना या निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहनही त्यांनी केले.

Latest Posts

Don't Miss