Sunday, November 17, 2024

Latest Posts

अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी बनावट ओळखपत्रे वापरून प्रवास केला : गुन्हे दाखल करा – संजय राऊत

| TOR News Network |

Sanjay Raut Latest News : अजित पवार आणि एकनाथ शिंदे वेशांतर करून विमानतळावर जातात त्यांना कुणी रोखत नाही.  याचा अर्थ त्यांनी नाव बदलून, बनावट पासपोर्ट, पॅनकार्ड, आधारकार्ड ओळखपत्रे बनवली आहेत.(CM Shinde,Dcm pawar used feke ID by Air) ओळपत्राशिवाय विमानतळावर  कोणीही सोडत नाही. या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने दखल घेऊन चौकशी होणे गरजेची आहे (Sanjay Raut Demand NIA inquiry) अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. (Sanjay Raut On Cm,Dcm Fake identity)

अजित पवार 2 जुलै 2022 रोजी राष्ट्रवादीत बंडखोरी करून  भाजपसोबत सत्तेत सामील झाले.  या सत्तानाट्यादरम्यान दिल्लीत अजित पवार आणि अमित शाह यांच्यात 10 बैठकाही झाल्या.(Sanjay Raut on Amit Shah) या बैठकांना जाण्यासाठी अजित पवार विमानाने प्रवास करताना नाव बदलून, वेशांतर करून, मास्क आणि टोपी घालून,  दिल्ली-मुंबई, मुंबई-दिल्ली असा प्रवास करत होते. या वेशांतरामुळे आपले  सह प्रवासी सुद्धा आपल्याला ओळखत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. अजित पवार यांच्या या खुलाशानंतर संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागल आहे.(Sanjay Raut slams Ajit Pawar)

संजय राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नाट्यकलेविषयी माध्यमांना माहिती दिली. त्यांनी  मुंबईतून दिल्लीला प्रवासी विमानातून किमान 10 ते 12 वेळा वेश पालटून प्रवास केला. नुसता वेष पालटूनच नाही तर प्रवास करताना  बनावट नावाचाही वापर केला गेला. (Sanjay Raut On Fake name use by CM,DCM) कोणी म्हणतो ए. पी. अनंतराव, तर कोणी म्हणतो ए. ए. पवार या नावाने ते दिल्ली गेले. दाढी-मिश्या लावल्या होत्या, टोपी घातली होती, अशा बऱ्याच गोष्टी केल्याचे त्यांनी स्वत: सांगितले.

अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या अशा कृत्याने अतिरेकी, दहशतवाद्यांनाही प्रोत्साहन मिळाले आहे.  अतिरेकी नाव बदलून, वेष बदलून देशात घुसू शकतात. दाऊन इब्राहिम किती वेळा भारतात आला असेल?, असाही सवाल त्यांनी  उपस्थित केला आहे. इतकेच नव्हे तर परदेशात जे उद्योगपती पळून गेलेत, त्यांनीही अशाच पद्धतीने दिल्ली आणि मुंबई विमानतळावरून अनेकदा प्रवास केला असेल.  दाऊद इब्राहिम, कादर मेनन, छोटा शकील यांनाही वेशांतर करून  मुंबई आणि दिल्लीमध्ये येण्याची मुभा मिळाली होती का?  त्यांच्यातून अतिरेकी आणि दहशतवाद्यांना प्रेरणा मिळाली असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

Latest Posts

Don't Miss