Tuesday, January 14, 2025

Latest Posts

अजित पवारांना बारामती कळलीच नाही

| TOR News Network |

Supriya Sule Latest News : ज्या अजित पवारांनी १८ वर्ष पालकमंत्री पद भोगले त्यांना अजून बारामती कळलीच नाही, असा दावा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. (Supriya sule on Ajit Pawar) एका वृत्तवाहिनी सुप्रिया सुळे यांनी मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी अजित पवारांसह भाजपावर निशाणा साधला. (Supriya Sule Slams Bjp) भाजपासाठी अजित पवार यांची उपयुक्तता संपलीय, असा टोला त्यांनी लगावला.(Supriya Sule On Loksabha Election Result)

बारामती लोकसभा निवडणुकीकडं यंदा संपूर्ण देशाचं लक्ष होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या होत्या.(Supriya Sule vs Sunetra Pawar) नणंद-भावजयीमध्ये झालेल्या या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. या निवडणूक निकालावर वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी सविस्तर विश्लेषण केलं. (Supriya sule on Baramati Election)

शरद पवारांची या मतदारसंघात भावनिक गुंतवणूक आहे. मी देखील या विजयाबाबत साशंक होते. दूधसंघ, कारखाना, बँक, सर्व यंत्रणा त्यांच्याकडं होती. 18 वर्ष ते पालकमंत्री होते. पण, बारामती आणि शिरुर हे दोन्ही मतदारसंघ शरद पवारांनाच कळतात. (Supriya sule on sharad pawar) मला किंवा अमोल कोल्हे यांना कळत नाही. अजित पवारांनी नंतर तर शिरुर मतदारसंघ सोडून दिला होता. ते सलग 42 दिवस बारामतीमध्ये होते. पण, ही निवडणूक लोकांनीच हाती घेतली होती, असं सुळे यांनी सांगितलं.

बारामती मतदारसंघ हा मला किंवा अजित पवारांना समजत नाही तो फक्त शरद पवारांना समजतो, हे माझं या निवडणुकीनंतर ठाम मत झालंय.(Sharad Pawar Know Baramati very well) चिन्ह, पक्ष, नेते, कार्यकर्ते, संस्था सर्व त्यांच्या बाजूला होती. आमच्याकडं काहीही नव्हतं. आम्ही फकिर होतं. बारामतीमध्ये कार्यकर्त्यांची सुरुवात चारपासून झाली आणि त्यानंतर कारवाँ बढ गया. हा कारवाँ मी 18 वर्षात कधीच पाहिला नव्हता. ही निवडणूक पूर्णपणे लोकांनी हातामध्ये घेतली होती. बाकीच्या तालुक्यांमध्ये इतकं प्रेम मिळेल असं मला वाटलं नाही. या विजयानं माझ्यावरची जबाबदारी वाढलीय. मी मतदारांची कृतज्ञ आहे, असं सुळे यांनी सांगितलं.

Latest Posts

Don't Miss