Sunday, January 12, 2025

Latest Posts

आजारी अजितदादांची दिल्लीत अमित शाहांसोबत दीड तास बैठक

फडणवीस, शिंदेविनाच घेतली भेट ः चर्चांना उधान

डेंग्यूने ग्रासल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही दिवसांपासून अलिप्त होते.त्यांनी दिवाळीत निमित्त कार्यकर्त्यांना भेटणार नसल्याची पोस्ट समाज माध्यमांवर टाकली होती.मात्र आता एकाकी त्यांनी दिल्ली वारीने चर्चेंना उधान आले आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत दीड तास चर्चा केल्याने तर्कवितर्क लावल्या जात आहे. (Ajit Pawar Meets Amit shah in Delhi) विशॆष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनउपस्थित होते.

डेंग्यूच्या आजारातून आपण बरे होत असून, विश्रांतीसाठी दिवाळीत कार्यकर्त्यांना भेटता येणार नाही, असे अजित पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी म्हटले होते. आजारपणामुळे अजित पवार दिवाळीसाठी बारामतीलाही गेले नव्हत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील बाणेरमधील घरी कौटुंबिक कार्यक्रमामुळे पवार कुटुंबीय जमलेले होते. त्यामध्ये शरद पवार व प्रतापराव पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. या कौटुंबिक स्नेहसंमेलनात सहभागी झालेले अजित पवार खासगी विमानाने थेट दिल्लीत दाखल झाले.त्यानंतर त्याच्यात चर्चा झाली.अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी कोटय़ातून मराठा आरक्षण देण्यास विरोध केला आहे. या संदर्भातही अमित शहांनी अजित पवारांशी संवाद साधला असल्याचे सांगितले जात आहे.या भेटीनंतर अजित पवार गटाच्या वतीने कोणीही भाष्य केलेले नाही.

बैठकीला हे नेते होते उपस्थित

शाहा यांच्या  ६-अ कृष्ण मेनन रोडवरील निवासस्थानी अजितदादांनी चर्चा केली. ही सदिच्छा भेट तासाभरापेक्षाही जास्त वेळ झाल्याने राज्यातील राजकीयदृष्टय़ा संवेदनशील मुद्दय़ांसंदर्भात शहांनी अजित पवारांशी संवाद साधल्याचे सांगितले जाते आहे. यावेळी अजित पवार यांत्या सोबत त्यांचे सहकारी प्रफुल पटेल आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते.

Latest Posts

Don't Miss