Saturday, January 11, 2025

Latest Posts

अमित शाह मुंबई ; दादा अनुपस्थित

| TOR News Network |

Ajit Pawar Latest News : देशाचे गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुक बघता त्यांनी काल भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक घेतली.(Amit Shah Meeting in Mumbai ) त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या घरी जात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. या सर्व घडामोडीत उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते.(Ajit Pawar Absent on Amit shah Tour) त्यामुळे अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरु आहे? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अजित पवार काल बारामतीत होते. पण काल रात्री ते मुंबईत आले. त्यानंतर अजित पवार अमित शाहांना भेटणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र अद्यापपर्यंत त्यांची भेट झाली नसल्याचं समोर आलं आहे.(Ajit Pawar Not Meet Amit Shah) मुंबईत असतानाही अजित पवार आणि अमित शाह यांची भेट न झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. सध्या सगळीकडे गणेशोत्वाचा उत्साह आहे. त्यानिमित्त अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. (Amit Shah visit Varsha) तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरच्या गणरायाचं देखील त्यांनी दर्शन घेतलं आहे. तसंच आशिष शेलार यांच्या घरीही त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं.

काल रात्री सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाह यांनी भाजप नेत्यांची बैठक घेतली. (Amit Shah Meeting at Sahyadri With BJP Leaders)

 तर वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली. मात्र यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र उपस्थित नव्हते. अजित पवार आज मुंबईत आहेत. मात्र त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Latest Posts

Don't Miss