Saturday, January 18, 2025

Latest Posts

नाशिक शिक्षक मतदार संघातील उमेदवाराच्या संस्थांवर शासकीय यंत्रणेचे छापे.

| TOR News Network |

Teachers Constituency Latest News  :  नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या विवेक कोल्हेंच्या विविध संस्थांवर सरकारी यंत्रणेंनी छापेमारी केली. (Raid On Indipendent candidate in nashik) विवेक कोल्हेंनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागं घेण्यासाठी ही छापेमारी केली जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.(Raid On vivek kolhe institutions in Nashik) मात्र यावर कोल्हेंनी अद्यापही स्पष्टीकरण दिलेलं नसल्यानं छापेमारीचं कारण गुलदस्त्यातच आहे.

देशातील लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागली. या निवडणुकीत जवळपास 36 जणांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. (Nashik Teachers Constituency News)यात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधु डॉ राजेंद्र विखे पाटील, तसेच कोपरगाव येथील भाजपाचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र व अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे त्याचबरोबर महायुतीकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला.

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीत उभी फूट पडल्याचे दिसून येत आहे. (Crises in Mahayuti for Teacher constituency Election) कारण शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अॅड. महेंद्र भावसार तसेच मूळचे भाजपचे असलेले मात्र अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले विवेक कोल्हे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मात्र एकजूट बघायला मिळत असून वरिष्ठांच्या आदेशानंतर काँग्रेसच्या दिलीप पाटील यांनी माघार घेतली आहे. ठाकरे गटाचे संदीप गुळवे हे एकमेव नाशिकचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत.(Sandip Gulve From Mahavikas Aghadi)

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत 36 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र बुधवारी उमेदवारी अर्ज मागं घेण्याच्या शेवटच्या दिवशी डॉ राजेंद्र विखे पाटलांसह इतरही 14 जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागं घेतला. त्यामुळे या निवडणुकीच्या रिंगणात 21 जण उरले आहेत.(21 candidate in Nashik Teachers Constituency) यात महाविकास आघाडीकडून संदीप गुळवे, महायुतीकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्यासह अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात प्रमुख तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

कोपरगाव येथील विवेक कोल्हेंनी नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. (Vivek Kolhe to Contest Teachers Constituency From Nashik) अपक्ष उमेदवारी अर्ज मागं घेण्यासाठी कोल्हेंच्या संबंधित असलेल्या कोपरगाव येथील महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना तसेच संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था यांच्यावर राज्यातील विविध सरकारी यंत्रणेच्या पथकांनी छापेमारी केली. आतापर्यंत तिसऱ्यांदा सरकारी यंत्रणेनी कोल्हेच्या संस्थांवर छापेमारी केली. (Raid by government agencies on Vivek Kolhe)मात्र चौकशीत अद्याप काही गैरप्रकार आढळले नसल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या संदर्भात सरकारी अधिकारी आणि विवेक कोल्हे प्रसारमाध्यमांसमोर कधी माहिती देणार ? याकडं सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Latest Posts

Don't Miss