Saturday, January 11, 2025

Latest Posts

धनंजय मुंडे यांच्यासमोरच त्यांच्या गुडांनी मला मारलं

करुणा शर्मांचे पुन्हा मुंडेंवर खळबळजनक आरोप

Karuna Sharma Latest News : राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला.(Karuna Sharma Press on Dhananjay Munde) तसेच आपल्याला कोणीही मदत करायला पुढं आलं नसल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या.”धनंजय मुंडे यांच्यासमोरच त्यांच्या गुडांनी मला मारलं” असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे. (Karuna Sharma Serious Alligations Against Dhananjay Munde)

मुलानं जीवन संपवण्याची इच्छा बोलून दाखवली

करुणा शर्मा म्हणाल्या, “धनंजय मुंडेंच्या समोर मला त्याच्या गुंडानी मारलं. (Dhananjay Mundes People Bate Me) आपल्या पत्नीला असं कोण मारायला सांगतं का? माझा मुलानं आत्महत्या करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. आम्ही कसे जगतोय आम्हाला माहिती आहे. मी कोर्टातही दाद मागितली आहे पण कोर्टाकडून अद्याप धनंजय मुंडेंना नोटीसही पाठवलेली नाही. वांद्रे कोर्टात माझी घरगुती हिंसाचाराची केस दाखल आहे”

चार वेळा महिला आयोगात तक्रार दिली

“तुम्ही इतर महिलांना साथ देता मग मला का साथ देत नाही, असं मुंडेंना आवाहन करत मी चार वेळा महिला आयोगात तक्रार दिली पण काहीही झालेलं नाही. माझासारख्या इतरही अनेक महिलांवर अन्याय झाले आहेत त्यांनाही न्याय मिळालेला नाही. रुपाली चाकणकर जबाबदार पदावर आहेत त्यांनी यात लक्ष घालायला हवं,” अशी मागणीही करुणा शर्मा यांनी केली आहे.

मोदींचीही भेट घेणार, पुरावे देणार

दरम्यान, आपल्याला न्याय मिळावा यासाठी मी सुप्रीया सुळे, शरद पवार यांच्याशी भेट घेतली. उद्धव ठाकरेंची भेट झाली नाही, राज ठाकरेंही टोलचा मुद्दा घेतात मात्र, आमचे प्रश्न एकत नाहीत, वेळ देत नाहीत. आा सुप्रिया सुळेंकडून न्यायाची अपेक्षा आहे. यानंतर आता मी पंतप्रधान मोदींची भेट मागून सर्व पुरावे देणार असल्याचं सांगत आता दिल्लीत आंदोलन करणार आहे. (Karuna Sharma Will Meet PM Modi) माझा थेट प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना आहे की, भाजपचा नारा आहे ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ मग मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही करुणा शर्मा यांनी केली.

मग न्याय कुणाकडं मागायचा?

सर्वच पक्ष एकाच स्टेजवर बसले असल्यानं न्याय कुणाकडे मागायचा? माझा जीवाचं काही बरंवाईट झालं तर त्याला जबाबदार धनंजय मुंडे याचं सरकार आणि पोलीस असतील. माझा जिवाला धोका असूनही मी सुरक्षा मागूनही मला न्याय दिला जात नाही, असा आरोपही यावेळी करुणा शर्मा यांनी केला.

Latest Posts

Don't Miss