Thursday, January 16, 2025

Latest Posts

समरजित घाटगे नंतर हा भाजपचा बडा नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत !

| TOR News Network |

Sharad Pawar Latest News : विधानसभा निवडणूक बघता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तिकीटाचे गणीत जुळवण्यासाठी अनेत नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.(Big Shock to Bjp in Kolhapur) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे समरजित घाटगे यांनी भाजपला राम राम ठोकत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता पुण्यात देखील भाजपचे वरिष्ठ नेते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. (Big Leader From Pune To Left BJP) गणेशोत्सवातील एका कार्यक्रमात त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

पुण्यातील वडगाव शेरीत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार आणि भाजपचे नेते बापूसाहेब पठारे हे भाजपला रामराम करण्याची शक्यता आहे. (Bapusaheb Pathare to Left BJP) पठारे यांची लवकरच घरवापसी होण्याची शक्यता आहे. बापूसाहेब पठारे गणपती मंडळाच्या कार्यक्रमातून हाती तुतारी घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

बापूसाहेब पठारे सध्या भाजपमध्ये आहेत. राष्ट्रवादीचे दोन गट पडले. अजित पवार गट हा भाजपसोबत गेला. राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे वडगाव शेरीचे आमदार आहेत. त्यामुळे ही जागा अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. वडगाव शेरीची जागा भाजपकडे नसल्याने बापूसाहेब पठारे नाराज आहेत. थेट गणपती मंडळाच्या कार्यक्रमातूनच हाती तुतारी घेण्यात असल्याचे संकेत दिले आहेत.(Bapusaheb Pathare to Hold Ncp Tutari) आगामी विधानसभा निवडणुकीत आपलं चिन्ह तुतारी असल्याचं बापूसाहेब पठारे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पठारे हे लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्येदेखील राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे.(Harshawardhan Patil Likely to join Sharad Pawar NCP) इंदापूरमधील बॅनरने लक्ष वेधलं आहे. इंदापूरच्या आठवडे बाजार आणि आज एक फ्लेक्स भरचौकात लागला होता. त्यावर शरद पवार पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे फोटो आहेत. त्यावर लिहिलेला मजकूर लक्ष वेधून घेत आहे. ‘इंदापूर तालुक्याची झाली तयारी… हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी’, असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे.

Latest Posts

Don't Miss