Saturday, January 11, 2025

Latest Posts

नरेंद्र मोदी हे 4 जूननंतर पंतप्रधान नसतील

Theonlinereporter.com – May 11, 2024 

Sanjay Raut Latest Statement : “नरेंद्र मोदी हे 4 जूननंतर पंतप्रधान नसतील. (Modi  will no more pm after 4 june) ते झोला घेऊन हिमालयात जातील, की त्यांनी व अमित शहा मिळून जी ‘कांडे’ देशात केली त्याबद्दल त्यांना न्यायालये, चौकशी आयोगासमोर खेटे मारावे लागतील ते सांगता येत नाही; पण मोदी जाता जाता जी भाषणे आणि वक्तव्ये करीत आहेत ती त्यांच्या निराश-हताश मानसिकतेची लक्षणे आहेत. मोदी यांनी स्वतःला प्रचारात गुंतवण्यापेक्षा त्वरित वैद्यकीय उपचार करून घेणे गरजेचे आहे,” असा टोला ठाकरे गटाने ‘सामना’च्या अग्रलेखातून केली आहे. (Sanjay raut slams modi) 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातीत आघाडीचे उद्योजक अंबानी आणि अदानी यांचा उल्लेख करत केलेल्या टीकेवरुन आता ठाकरे गटाने भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut on Modi) अदानी-अंबानींकडून काँग्रेसला काळा पैसा पुरवला जात असल्याचा आरोप मोदींनी जाहीर सभेत केल्यानंतर आता ठाकरे गटाने जर या उद्योजकांनी पैसा पुरवल्याची कल्पना केंद्रातील प्रमुख नेत्यांना आहे तर सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच सीबीआयच्या माध्यमातून कारवाई का करत नाही असा सवाल विचारला आहे.

‘‘अंबानी-अदानीने काँग्रेसला पोते भरून काळा पैसा पाठवलाय व आता काँगेसचे शहजादे अंबानी-अदानीचे नाव घेत नाहीत. (Sanjay raut on bjp claim)’’ यावर राहुल गांधी यांनी त्यांच्या पद्धतीने मार्मिक उत्तर मोदींना दिले. गांधी म्हणतात, ‘‘एरवी बंद खोल्यांत अंबानी-अदानी करता. आज पहिल्यांदाच जाहीरपणे बोलत आहात. मोदीजी, आपण घाबरलात की काय?’’ (Sanjay raut question modi) गांधी म्हणतात ते खरेच आहे. मोदींची सध्याची भाषणे व भूमिका त्यांचे पाय लटपटले असल्याचे लक्षण आहे. मोदी यांच्या काळात मूठभर उद्योगपतींची भरभराट झाली. त्यात त्यांचे मित्र अदानी यांचे नाव आघाडीवर आहे,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

पीएमएलए कायदा तेच सांगतो. मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला केला, पण मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारून स्वतःलाच संकटात टाकले. मोदी ब्रॅण्डचे हे अधःपतन व घसरण आहे. मोदी-अदानी यांचे संबंध जगजाहीर आहेत. मोदी यांचे वक्तव्य पाहून त्यांच्या या उद्योगपती मित्रांनाही वाटले असेल, मूर्ख मित्रापेक्षा बुद्धिमान शत्रू बरा. मोदी यांचे वक्तव्य गंभीर आहे. अखेर राहुल गांधी यांनी मोदी यांना गुडघ्यावर आणले. काळ्या पैशांचा स्रोत नक्की कोठे आहे, याचा खुलासा करण्यास भाग पाडले. झोला घेऊन हिमालयात जाण्याची वेळ आणि मुहूर्त मोदींनी मुक्रर केला हे स्पष्ट झाले. मोदी यांची प्रकृती बरी नाही. त्यांना योग्य उपचारांची गरज आहे. मोदींनी वेळीच विश्रांती घेतली नाही तर भाजप 100 आकडाही पार करणार नाही. मोदी ब्रॅण्ड पूर्णपणे संपला आहे,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.(Sanjay Raut on Modi Brand)

Latest Posts

Don't Miss