Saturday, January 11, 2025

Latest Posts

नारायण राणे दोन महिन्यानंतर तिहार जेलमध्ये असतील

| TOR News Network | Sanjay Raut Latest News :  ऐन लोकसभा निवडणुकीत नारायण राणे आणि ठाकरे गटाने एकमेकांवर ‘शब्दबाण’ मारण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लवकरच अटक होणार असल्याचा दावा केला. राणेंच्या दाव्यानंतर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘दोन महिन्यानंतर सत्ता आल्यानंतर नारायण राणे हे तुरुंगात असतील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते सांगलीत बोलत होते. (After 2 month Narayan Rane will be in prison)

ठाकरे गटाने सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेवर काँग्रेसचा दावा होता. मात्र, ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देऊ केली. आता चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत सांगली दौऱ्यावर आहेत.(Chandrahar Patil Sangli lok sabha) सांगलीत पोहोचल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सांगलीच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांवर भाष्य केलं.

कदम आणि पाटील यांची नाराजी दूर करू

‘विश्वजीत कदम आणि विशाल पाटील आमचेच आहेत. त्यांची नाराजी लवकरच दूर होईल. सांगलीची जागा शिवसेनाच लढणार. विशाल पाटील आणि पतंगराव कदम यांच्याविषयी आम्हाला आस्था आणि प्रेम आहे. विशाल पाटील संसदेत कसे जातील, याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेणार, असे संजय राऊत म्हणाले.

काल गुरुवारी नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना अटक होणार, असा दावा केला. याबाबतच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले,’दोन महिन्यानंतर सत्ता आल्यावर नारायण राणे तिहार जेलमध्ये असतील.(Narayan rane will be in Tihar jail) नारायण राणे यांच्या ईडी/सीबीआयच्या बंद फाईल आमची सत्ता आल्यावर उघडणार आहे’.(We will open narayan ranes closed files)

Latest Posts

Don't Miss