Saturday, January 11, 2025

Latest Posts

उपोषणाला परवानगी नाकारली तरी जरांगे पाटील ठाम

| TOR News Network |

Jarange Patil Latest News : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे परत मराठा आरक्षणाचा मुद्दा घेत आंदोलनाला बसणार आहेत. (Maratha reservation news) हे आंदोलन आज शनिवारपासून सुरू होत आहे. (Jarange patil protest) मात्र या आंदोलनासाठी प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. गावात आंदोलनाला परवानगी देवू नये अशी तक्रार तहसीलदारांकडे गावातल्याच काही लोकांनी आणि जरांगेंच्या जुन्या सहकार्यांनी केली होती. त्यामुळे त्यांना परवागनी नाकारण्यात आली आहे.(No permission to jarange patil for protest) त्यामुळे जरांगे आता काय करणार असा प्रश्न होता. पण परवानगी नसली तरीही आंदोलन करणारच अशी ठाम भूमीका जरांगे यांनी घेतली आहे. (Jarange Patil to Sit on protest again)

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानुसार हे आंदोलन ते अंतरवाली सराटी इथे उपोषणाला बसणार आहेत.(Jarange patil on protest again in Antarwali Sarathi ) पण प्रशासनाने त्यांना आंदोलनाची परवानगी नाकारली आहे. (administration refuse permission for protest) अशा स्थितीत ते आंदोलन करणार असतील तर प्रशासनाची डोकेदुखी यामुळे वाढणार आहे. त्यामुळे जरांगे पाटील आणि प्रशासन यांच्यात वाद होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचा फटका लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला बसला. मोठ्या प्रमाणात महायुतीचे उमेदवार पराभूत झाले.(Jarange patil protest effects on mahayuti) याचा सर्वाधिक परिणाम हा मराठवाड्यात दिसून आला. पंकजा मुंडे, रावसाहेब दानवें सारख्या दिग्गजालाही पराभवाचा सामना करावा लागला. अशा स्थितीत विधानसभा निवडणुका हा काही महिन्यावर आल्या आहेत. जरांगे यांनी याआधीच मराठा उमेदवार विधानसभेला उभे करणार असे जाहीर केले आहे.(Jarange patil will give candidate in vidhansabha election) त्यामुळे त्यांचे आताचे उपोषण जास्त महत्वाचे ठरते. मात्र त्यांना प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. शिवाय काही झाले तरी उपोषणावर आपण ठाम असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

Latest Posts

Don't Miss