Thursday, January 16, 2025

Latest Posts

एका बाजूला बाबासाहेबांचे संविधान दुसरीकडे भाजपचं, तुम्ही कोणतं निवडणार ?

आदित्य ठाकरे यांची शिंदे सरकारवर घाणाघात

Aditya Thackeray Hit Out BJP : आज विधानसभेचे जे अध्यक्ष बसले आहेत ते आधी आमच्या बरोबर म्हणजेच शिवसेनेत होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले, आता भाजपासह गेले आहेत. त्यांचे ते खास मित्र झालेत. आता बहुदा काँग्रेसमध्ये जातील.असा टोला आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणातून राहुल नार्वेकर यांना लगावला आहे. हे अध्यक्ष महोदय वर्षा बंगल्यावर जाऊन काय करत होते? न्यायमूर्ती कधी आरोपीच्या घरी जातात? हे तुम्ही पाहिलं आहेत का? आता त्यांच्याकडून न्याय किती अपेक्षित ठेवायचा ते माहीत नाही. (Aditya Thackeray on samvidhan)

आदित्या ठाकरे म्हणालेत आम्ही न्याय मागत आहोत तो तुमच्याकडून मागत आहोत. कारण आम्ही महाराष्ट्राची जनता आहात.आपल्या सगळ्यांचा विश्वास बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलं आहे त्यावर आहे. १० तारीख म्हणजेच बुधवारचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण बुधवारचा निर्णय आपल्या बाजूने लागला, गद्दार बाद झाले तर समजायचं की हे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालले आहेत. पण उलटा निर्णय लागला तर मग तुम्ही लक्षात घ्या की २०२४ मध्ये भाजपाला जे संविधान लिहायचं आहे त्या दिशेने हे चालले आहेत. एका बाजूला भाजपाचं संविधान आहे दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आहे.(Which samvidhan you belive says aditya thackeray) तुम्ही कोणतं निवडणार? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

ही सगळी सर्कस सुरु आहे

घटनाबाह्य मुख्यमंत्री आपली खुर्ची घट्ट धरुन बसले आहेत. काही खुर्चीवर चढण्याचा प्रयत्न करत आहेत. जॅकेट घालून तयार आहेत. ही सगळी सर्कस सुरु असली तरीही घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेत लोक कमी पडतात आणि खुर्च्या जास्त फिरतात. गेल्या दोन वर्षात आपण पाहिलं की गरागरा सगळीकडे फिरतात आणि थकले की शेताकडे जातात अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

दोन हॅलीपॅड असलेले एकनाथ शिंदे पहिले शेतकरी

मुख्यमंत्र्यांच्या गावात पाऊस पडला की आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात जायला रस्ता उरत नाही. पण स्वतःच्या शेतात दोन दोन हेलीपॅड तयार करणारे गरीब मुख्यमंत्री आणि शेतकरी मी पाहिले आहेत असंही आदित्य ठाकरे म्हणाले. जगातलं पहिलं शेतकरी कुटुंब असेल यांचं (एकनाथ शिंदे) ज्यांच्या शेतात दोन हेलीपॅड आहेत. ५० खोके इतरांना दिलेत आणि हे मुख्यमंत्री झाले आहेत. असे खोकेवाले म्हणजे धोकेवाले यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे आपण महाराष्ट्र म्हणून ठरवणं आवश्यक आहे.

Latest Posts

Don't Miss