Saturday, January 18, 2025

Latest Posts

त्यांनी तर मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर जेसीबी चालवला – मुख्यमंत्री

बुलडोझर फिरवला त्यांना काय कळणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईतल्या बीचवर सफाई मोहिमेत सहभाग नोंदवला. त्यांनी स्वतः बीचवर ट्रॅक्टर चालवून त्याद्वारे कचरा साफ केला. त्यांच्या या ट्रॅक्टर चालवण्यावर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी खिल्ली उडवली होती. (CM Eknath Shinde response to aditya thackeray criticism for taking tractor to beach)ट्विट करत हा किती ‘आऊट ऑफ दि बॉक्स’ विचार आहे, अशा शब्दांत टीका केली होती. त्यांच्या या टिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, “ट्रॅक्टर कसला होता याची माहिती त्यांनी घ्यायला हवी होती, तो बीच कॉम्बर होता. म्हणजे समुद्राच्या बाजूला बीचवर जे दगड गोटे, कचरा, प्लॅस्टिक हे सगळं ते बीच कॉम्बरच्या जाळीत जमा होतो. यामध्ये या सर्व वस्तू ऑटोमॅटिक वेगळ्या केल्या जातात. यामुळं बीचवर फक्त चालण्यासाठी लोकांना वाळू राहते. खरं म्हणजे हे दुर्देव आहे की बोलणाऱ्यांनी पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे होती”

ज्यांना मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर जेसीबी चालवला आणि मुंबईच्या विकासावर बुलडोझर फिरवला त्यांना काय कळणार? मी दिल्लीला गेलो, तेलंगणाला गेलो, गावी गेलो शेती करायला आणि बीचवर सफाई करायला गेलो तरी सुद्ध यांना अडचण आहे.

तुम्हाला कसला मुख्यमंत्री पाहिजे?

खरंतर मी महाराष्ट्रातील जनतेलाच विचारतो की तुम्हाला घरी बसणारा मुख्यमंत्री पाहिजे की दिल्ली ते गल्लीपर्यंत सगळीकडं फिल्डवर काम करणारा आणि मुंबई डीपक्लीन ड्राईव्ह घेणारा मुख्यमंत्री पाहिजे. खरं म्हणजे मी काम करणारा कार्यकर्ता आहे, फील्डवर उतरुन काम करतो. घरी बसून काम करत नाही, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Latest Posts

Don't Miss