Sunday, January 12, 2025

Latest Posts

काँग्रेसच्या 5 आमदारांवर कारवाई निश्चित

| TOR News Network |

Congress Meeting Lates News : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली.या निवडणुकीत मते फुटणार हे निश्चित होते मात्र कोणाची ? याबाबत आडाखे बांधले जात होते. (Vidhan Parisha Cross Voting) निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्याच आमदाराने आमची मते फुटणार असे जाहीर करून खळबळ उडवून दिली होती. मतमोजणीनंतर निकाल स्पष्ट झाले, तेव्हा शेकापचे जयंत पाटील पडल्याचे स्पष्ट झाले. मतमोजणीनंतर दिसून आले की काँग्रेसची काही मते फुटली आहेत.(7 Congress Mla Cross Voted) काँग्रेस पक्षाने आढावा घेतला असता आपली सात मते फुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.  काँग्रेस पक्षाला ही मते कोणाची होती हे देखील कळाले आहे. त्यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर केला.(Cross Voting Report Submitted) यानंतर पक्षश्रेष्ठींना या सात जणांपैकी काही आमदारांनी संपर्क साधला. ज्यानंतर सातपैकी 2 आमदारांना अभय दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांकेतिक पद्धतीने काही आमदारांकडे अंगुलीनिर्देश केला होता. त्यांच्या सांकेतिक भाषेचा उलगडा केला असता झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके , हिरामण खोसकर यांच्या नावांची चर्चा होऊ लागली. त्यात भर पडली ती मोहन हंबर्डे आणि जितेश अंतापूरकर या दोघांच्या नावाची.(Congress to take  Action On 5 Mla) या पाच जणांव्यतिरिक्त आणखी दोन काँग्रेस आमदार कोण?, (2 mla to Relaxed From Action) याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. याच दोन आमदारांना अभय दिले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस हायकमांडच्या खास मर्जीतील आणि मराठवाड्यातील एका आमदाराकडे संशयाचे बोट उचलले जात आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील एका वजनदार नेत्याचेही नाव चर्चेत आहे. या आमदाराच्या नावाचा उल्लेख  ‘त्यांचा’ फोटोही पाहिल्यासारखे वाटते आहे, असे म्हणत शिवसेना (उबाठा) आमदार भास्कर जाधव यांनीही केला होता.

पक्षाच्या आदेशाविरोधात जाऊन मतदान केल्यामुळे काँग्रेस पक्षाची बदनामी झाली आहे. फुटीर आमदारांची नावे जाहीर केली नाही तर प्रामाणिक आमदारांवरही संशय व्यक्त केला जाईल आणि हे आमच्यासारख्या प्रामाणिक आमदारांसाठी फार वाईट बाब असेल, असे कैलास गोरंट्याल यांनी म्हटले होती.(Mla KailasGorantyal On Cross Voting) 19 जुलै रोजी काँग्रेसची बैठक होत असून यामध्ये या फुटीर आमदारांची नावे जाहीर करा अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यानुसार आज नावे जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. जे काँग्रेस आमदार विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहे, त्यांच्याविरोधात प्रामुख्याने कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss