Saturday, January 11, 2025

Latest Posts

4 जून नंतर देशात ‘अच्छे दिन’ ची सुरुवात होईल

Theonlinereporter.com – May 18, 2024 

Uddhav Thackeray Press : लोकसभा निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आज संपणार असून सोमवारी मतदान होणार आहे. (Fifth Phase Voting in india) शुक्रवारी मविआची रॅली झाल्यानंतर आज , शनिवारी सकाळी मुंबईत इंडिया आघाडीची पत्रकार परिषद शनिवारी झाली. (India Alliance press conference) येत्या 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार सत्तेवर येईल आणि देशातलं ‘जुमला’ पर्व संपेल आणि ‘अच्छे दिन’ची सुरुवात होईल असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.(Uddhav Thackeray on Acche Din) इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी त्यांनी मोदी आणि भाजप सरकारवर कडाडून हल्ला चढवला.(Uddhav Thackeray Slams Pm modi)

या संयुक्त पत्रकार परिषदेसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, रमेश चेन्नीथला, पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार, उद्धव ठाकरे , संजय राऊत आदी नेते उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परिस्थिती विषद केली. तसेच शिंदे सरकार, देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. (Uddhav Thackeray Slams Cm Shinde And Fadnavis)

केंद्र सरकारला मुंबई तोडायची आहे. (Uddhav Thackeray on central govt) महाराष्ट्राची लूट केली जात आहे, राज्याला बदनाम केलं जातंय. शासकीय यंत्रणांचा दुरूपयोग केला जातोय, असा आरोप त्यांनी केला.  भाजपकडून भ्रष्टाचाऱ्यांचा सन्मान केला जातो अशी टीकाही त्यांनी केली. (Uddhav Thackeray on corruption) मोदी घटनाबाह्य सरकारला सोबत घेऊन हुकूमशाहीचा प्रचार करतायत. तोडा, फोडा आणि राज्य करा यावर भाजपचा भर आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.

Latest Posts

Don't Miss