Saturday, January 18, 2025

Latest Posts

उद्धव ठाकरेंना धक्का : आमदार राजन साळवी यांच्याकडे एसीबीची धाड

ACB Raid On MLA Salvi : शिवसेना उपनेते आणि आमदार डॉ. राजन साळवी यांची चौकशी सुरु झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) ही चौकशी गुरुवारी सकाळी सुरु करण्यात आली. या चौकशीसाठी त्यांच्या निवासस्थानी आणि हॉटेलवर रत्नागिरी आणि रायगड येथील एसीबीचे पथक पोहचले. अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी सुरु केली आहे. तर याच दरम्यान त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Raid On Shiv Sena MLA Rajan Salvi)

रत्नागिरी एसीबी कडून गुन्हा दाखल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. कारण, साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी एसीबी कार्यालयातून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Offence Regestered on MLA salvi)

यापूर्वी अधिकारी आले होते

राजन साळवी यांच्या जुन्या घरी, सध्या राहत असलेल्या घरी, हॉटेलमध्ये एसीबीचे अधिकारी सकाळी दहा वाजता पोहचले आहे. एसीबीचे १८ ते २० अधिकारी आले आहे. त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदेश आले होते.(Rajan Salvi ACB Raid) त्यानंतर त्यांनी चौकशी सुरु केली. घरातील एका सदस्याने सांगितले की, यापूर्वी घरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आले होते. ते घराचे मोजमाप करुन गेले. आता एसीबीचे अधिकारी आले आहेत.

हे विरोधकांना संपवण्याचे काम

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी घरात कपडे किती आहे, भांडी किती आहे, कागदपत्रांची तपासणी करत आहेत, असे घरातील सदस्याने सांगितले. यापूर्वी अधिकाऱ्यांनी चौकशीला बोलवले होते. आम्ही सहकार्य केले. यामुळे चौकशी संपली असे आम्हाला वाटले होते. परंतु विरोधकांना संपवणे हे काम सध्याच्या सरकारने सुरु केले आहे. राजन साळवी दुसऱ्या ठिकाणी देवदर्शनासाठी गेले आहेत. ते चौकशीला सहकार्य करणार आहे.

काय म्हणाले आमदार साळवी

चौकशीचे परिणाम काय होऊ द्या, सामोर जाण्याची माझी तयारी आहे. माझ्या पक्षावर पुन्हा विश्वास आहे. आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्यामुळे आमची चौकशी सुरु झाली आहे. आम्ही कसे आहोत, हे जनतेला माहीत आहे. माझ्या पाठिशी माझे मतदार आणि संपूर्ण जिल्हा आहे. मी कारागृहात गेलो तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे राजन साळवी यांनी सांगितले. अधिकारी कालपासून रत्नागिरीत आले. त्यांच्या प्रत्येक हालचालींची माहिती आपणस मिळत होती. आता ही त्यांनी सुरुवात केली आहे. मी उद्धव ठाकरे सोबत असल्यामुळे ही कारवाई सुरु आहे.

Latest Posts

Don't Miss