सूटचा फायदा घेत घ्या शॉपिंगची मजा
Black Friday Sale: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती ब्लॅक फ्रायडे सेलची. उद्यापासून तो देशातही सुरू होणार आहे. ब्लॅक फ्रायडे सेल म्हणजे शॉपिंग. तुम्हाला ग्राहक म्हणून खरेदीवर मोठी सूट दिल्या जाते. तुम्ही या दिवसात चांगले प्रकारे बचत करू शकता. तर आज थॅंक्सगिविंगचा दिवस आहे. हा दिवस प्रामुख्याने अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडा ह्या देशांमध्ये साजरा केला जाणारा एक मोठा सण आहे. (Today Thanks Giving Day And Tomorrow Black Friday Day)
सध्या नोव्हेंबर-डिसेंबरचा काळ सुरू आहे.म्हणजे लवकरच ख्रिसमस आणि न्यू इयरचं सेलिब्रेशन करण्यासाठी सगळेच तयारीला लागत असतात त्यासाठी ते उत्साही असतात. पाश्चात्त्य देशांमध्ये या सणांचे महत्त्व मोठे आहे. त्याचबरोबर ख्रिसमस आणि न्यू इयरच्या आधी येतो तो अजून एक सण आणि तो म्हणजे थॅंक्सगिविंगचा. अमेरिकेत थँक्सगिव्हिंगच्या दुसऱ्या दिवशी ब्लॅक फ्रायडे सेल सुरू होतो. ख्रिसमसच्या तयारीची आणि खरेदीची सुरुवात म्हणून याकडे पाहिले जाते ज्यादरम्यान अनेक मोठे ब्रँड आणि स्टोअर्स ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सूट देतात. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी जंगी सेलिब्रेशनचा असतो. लोकं आपल्याकडील पैसे खर्च करतात आणि मोठे ब्रॅंड्सही खूप जास्त प्रमाणात पैसे कमवतात. त्यामुळे सगळ्यांसाठी हा काळ आनंदाचा आणि कमावण्याचा असतो.अलीकडच्या काळापासून पाश्चात्त्य देशांमध्ये साजरे होणारे अनेक सण भारतातही मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येत आहेत. भारतातही हा सेल 25 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तेव्हा भारततही मोठे ब्रॅंन्ड्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्तमोत्तम ऑफर देतात. अॅमेझॉन , फ्लिपकार्ट, क्रॉमासह अनेक मोठे ब्रॅंण्ड्स सध्या आपल्या इथे चांगली सूट देत आसतात. उद्यापासून भारतातही अनेक मोठ्या ब्रँड्सवर प्रचंड सूट उपलब्ध राहणार आहे.