Friday, January 17, 2025

Latest Posts

आजपासून सिमकार्ड खरेदी विषयी बदलले नियम

आजपासून सिमकार्ड खरेदी विषयी बदलले नियम

New Rules For SIM Card : केंद्र सरकाने सिम कार्ड खरेदीसाठी आता नवे आणि कडक नियम लागू केले आहेत. नवे नियमांची अंमलबजावणी आज 1 डिसेंबर 2023 पासून करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने हे पाऊल टाकलं आहे.

आधुनिक जीवनशैलीत मोबाईलशिवाय आपण एक क्षण पण राहू शकत नाही. त्यामुळे मोबाईल फोनचा वापर करणाऱ्यांसाठी सिम कार्ड नियमांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. सिम कार्डविषयी आज 1 डिसेंबर 2023 पासून नवे नियम लागू झाले आहेत. (Central Government Changed The Rules For Purchasing Of New SIM Cards) जर तुम्ही नवीन सिमकार्ड घेण्याच्या विचारात असाल तर हा नियम तुमच्यासाठी महत्वाचा आहे. नवीन नियमांच्या अंमलबजावणीनंतर एका ओळखपत्रावर सिम खरेदीला बंधन येतील. अतिरिक्त सिम खरेदीवर कडक कारवाई प्रस्तावित आहे. बोगस सिमकार्डचे सध्या पेव फुटले आहे. तसेच त्याआधारे फसवणुकीचे प्रकार पण वाढले आहेत. वाढत्या फसवणुकीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने सिम कार्ड खरेदी आणि विक्रीसाठी नवीन नियम लागू करण्यात येतील. हे नवीन नियम 1 डिसेंबरपासून संपूर्ण देशात लागू होतील. त्यामुळे बोगस सिमकार्ड आधारे करण्यात येणाऱ्या घोटाळ्यांना पायबंद घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दंड आणि तुरुंगाची तरतूद आहे.

असे असतील नवे नियम

सिम डीलर व्हेरिफिकेशन – सिम कार्ड डीलरसाठी नियमात कडक तरतूद करण्यात आली आहे. दूरसंचार कंपन्यांना डीलरचे व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्यांना एजन्सी देता येणार नाही. त्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन, पडताळा अनिवार्य करण्यात आली आहे. नाहीतर टेलिकॉम कंपनीला 10 लाख रुपयांपर्यंत दंड लागू शकतो.

आधार कार्डची प्रत – ज्या ग्राहकांना सिम कार्ड खरेदी करायचे आहे. त्यांना आधार कार्डशिवाय सिम कार्ड खरेदी करता येणार नाही. इतर कोणाच्या आधारचा वापर केल्याचे आढळल्यास दंड आणि शिक्षेची तरतूद आहे

सिम कार्डची मर्यादा – नवीन नियमांनी किती सिमकार्ड असावेत याची मर्यादा स्पष्ट केली आहे. व्यावसायिक वापरासाठी घाऊक सिम कार्ड खरेदीबाबत नवीन नियम आला आहे. तर एका ओळखपत्रावर वैयक्तिक वापरकर्त्याला 9 सिम कार्ड खरेदी करता येतील.

डीएक्टिव्हसाठी कालावधी –तुमचे सिमकार्ड तुम्ही बंद केले. ते डिएक्टिव्ह झाल्यावर 90 दिवसांचा वेटिंग पिरियड असेल. तीन महिन्यानंतर हा क्रमांक इतर व्यक्तीला देता येईल.

Latest Posts

Don't Miss