| TOR News Network |
Navi Mumbai Building Collapse : शनिवारी (27 जुलै) पहाटे 5 च्या सुमारास नवी मुंबईतील शहाबाज गावात 4 मजली इमारत कोसळली असून ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले आहेत.(Many people trapped under the debris) घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मनपा अधिकारी आणि पोलीस, NDRF टीम घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्यही सुरू झाले आहे. (Rescue work is underway)आतापर्यंत २ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीत 26 कुटुंबे राहत होती.(26 Family lives at collasped building) यात एकूण 100 हून अधिक नागरिक असल्याचेही सांगण्यात येत आहे. अग्निशमन दल, मनपा अधिकारी कर्मचारी JCB च्या सहाय्याने ढिगारा हटवला जात आहे.
दरम्यान इमारतीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या सलून चालकाला पहाटे पाचच्या दरम्यान जाग आली. इमारत हालत असल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने आरडाओरड सुरू केली आणि इमारतीतील काही लोकांना सावध केले, तोपर्यंत आसपासचे नागरिकही गोळा झाले होते, नागरिकांनी मिळून इमारतीतील काही लोकांना सुखरूप बाहेरही काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. (Loss of life was avoided.) पण अद्यापही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगितले जात आहे.
नवी मुंबईमहापालिका आयुक्त कैलाश शिंदे म्हणाले, “ही इमारत आज पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान कोसळली. सेक्टर-१९, शाहबाज गावातील ही जी चार मजली इमारत आहे. इमारतीतून ५२ जण सुरक्षित होते. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 2 जणांना बाहेर काढण्यात आले असून आणखी 2 जण अडकले असण्याची शक्यता आहे. एनडीआरएफचे पथक बचावकार्य करत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे ही इमारत 10 वर्षे जुनी आहे, त्याची चौकशी सुरू असून इमारत कोणाच्या मालकीची आहे, त्याच्यावर कारवाई केली जाईल.(Action on building owner)
प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची हकीकत सांगितली. त्यानुसार, सकाळी उठलोच होतो तर काहीतरी कोसळण्याचा जोरात आवाज झाला. बाहेर येऊन पाहिले तर शेजारची इमारत ही पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. रात्री तर ही इमारत डोळ्यासमोर होती. पण डोळ्यादेखत तिचा ढिगारा झाला. आम्ही लागलीच या घटनेची माहिती संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना दिला. आता घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे.(Rescue operation started at the spot)