•   Thursday, August 28
मुंबई

तलाठी भरतीची मोठी अपडेट

राज्यातील तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. विविध जिल्ह्यातील तलाठींची एकूण 4625 रिक्त पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाकडून या भरतीसाठी 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे.

मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी आणि पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करु शकतात. यासोबतच मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाकडून तलाठी भरती परीक्षा घेण्यात येणार असून लवकरच त्याची लिंक खुली करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या 36 जिल्ह्यांतील 4644 पदांच्या भरती केली जाणार आहे. यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागांचा समावेश आहे. सर्व जिल्ह्यातील तलाठ्यांची 4644 पदे भरली जातील. यासाठी लवकरच परीक्षा घेतली जाणार आहे.

महत्वाची अपडेट म्हणजे तलाठी भरती परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका नसेल. राज्यातील सर्व जिल्हातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरव्यवहाराची मागील उदाहरणे पाहता महाराष्ट्र शासनाने महत्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा टीसीएस कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. ही परीक्षा घेण्यासाठी टीसीएस कंपनीकडून 17 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत.

तलाठी भरती परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरल्यास ते बाद करण्यात येतील याची नोंद घ्या. तलाठी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना राज्य शासनाकडून वेळोवेळी जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.