•   Thursday, August 14
आरोग्य

वाढत्या तापमानामुळे होणारी 'हट एंजाइटी' म्हणजे नेमकं काय?

सध्या तापमानाचा पारा वर गेला आहे. बहुतेकजण उष्णतेच्या लाटेमुळे चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात स्वतची काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा, उन्हाच्या तडाख्यात सापडल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या दिवसांमध्ये उन्हाची झळ लागणे, बॉडी डिहायड्रेशन यासारख्या समस्या येतात. तसेच उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे 'हट एंजाइटी'च्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते.


हट एंजाइटी' म्हणजे नेमकं काय?


या काळात शरीर उच्च तापमानाच्या संपर्कात येते आण अंतर्गत तापमानाचे योग्य प्रकारे संतुलन राखू शकत नाही. या अवस्थेला 'हट एंजाइटी' असे म्हटले जाते. थोडक्यात, उष्ण वातावरणात संपर्कात आल्यामुळे थकल्यासारखे होते. यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, छातीत धडधड आण अस्वस्थता वाढणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या दिवसांमध्ये जास्त काळजी घ्यायला हवी. मानवी शरीराच्या तापमानाचे संतुलन राखण्यासाठी अनेक पद्धती असतात.


जास्त काळापर्यंत जास्त तापमानाच्या संपर्कात राहिलात तर शरीरातून घाम बाहेर पडत नाही आणि रक्तवाहिन्यांचे काम सुरळीत चालत नाही. याचे कारण शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता संपलेली असते. त्यामुळे शरीरातील तापमान योग्य प्रमाणात राहत नाही. परिणामी, 'हट एंजाइटी'चा त्रास होतो. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे 'हट एंजाइटी' होऊ शकते. म्हणूनच शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे गरजेचे आहे.