न्यू इंग्लिश ज्यूनिअर कॉलेजची गोरेवाडा जैवविविधता पार्क येथे शैक्षणिक भेट
नागपूर. महाल येथील न्यू इंग्लिश ज्यूनिअर कॉलेजच्या इयत्ता बारावीच्या जीवशास्त्र (बायोलॉजी) विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच निसर्गातील जैवविविधता अनुभवली. १६ मे २०२३ रोजी महाविद्यालयाद्वारे गोरेवाडा जैविविधता पार्क येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती.
शाळेच्या शिक्षिका डॉ. देवश्री नगरकर आणि बरखा जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात जीवशास्त्र विभागाच्या १५ विद्यार्थ्यांनी जैवविविधता पार्कमधील माहिती जाणून घेतली. गोरेवाडा अभयारण्यचे जीवशास्त्र श्री. शुभम छापेकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आदींची माहिती दिली व त्यांच्या शंकांच्या निरसरण केले. विद्यार्थ्यांना पार्कमधील वॉकींग ट्रेलवर नेण्यात आले यावेळी त्यांना तलाव, विविध प्रकारचे पक्षी, प्राणी किटक, फुलपाखरू आणि वनस्पतींची ओळख करून देण्यात आली.
या निसर्ग भेटीने विद्यार्थ्यांना ‘लाईफ – अ लाईफस्टाईल फॉर एन्वहार्मेंट’ या अभियानाशी जुळण्याकरिता प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांसाठी ही वर्गखोलीबाहेर जीवशास्त्रीय, पर्यावरणपूरक अनोखी अनुभूती ठरली. या शैक्षणिक भेटीने विद्यार्थ्यांन विविध जीव आणि प्राण्यांची आनंददायी आणि प्रेरणादायीरित्या माहिती मिळाली