•   Thursday, August 14
शिक्षण

लगेच अर्ज करा ; काही तासच शिल्लक ( पात्रता सातवी-दहावी मासिक वेतन लाखापर्यंत )

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.


लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) आणि चपराशी (गट ड) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 13 जून 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती लघुलेखक (निम्नश्रेणी) लघुटंकलेखक जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) चपराशी (गट ड) एकूण जागा – 512

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा सातवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार लघुलेखक (निम्नश्रेणी) - 41,800 - 1,32,300 रुपये प्रतिमहिना लघुटंकलेखक - 25,500 - 81,100 रुपये प्रतिमहिना जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) - 21,700 - 69,100 रुपये प्रतिमहिना चपराशी (गट ड) - 15,000 - 47,600 रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 13 जून 2023

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://stateexcise.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.