राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांना अजीम प्रेमजी फाउंडेशनचे नियुक्तीपत्र माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील कुलगुरू कक्षात नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम गुरुवार, दिनांक १ जून २०२३ रोजी पार पडला.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्याम कोरेटी, गणित विभाग प्रमुख डॉ. गणेश केदार, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन उपस्थित होते. गणित विभागातील सुयश्री आंबोलीकर, शिवानी देशभ्रतार, वैष्णवी खुजणारे, प्रशांत शामकुवर, कपिल सरदार या विद्यार्थ्यांना अजीम प्रेमजी फाउंडेशनचे तर देवेंद्र शर्मा या विद्यार्थ्यास टीसीएसचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
गणित विभागातील रामानुजन सभागृहात २४ व २५ एप्रिल २०२३ रोजी रोजगार व प्रशिक्षण सेलच्या माध्यमातून अजीम प्रेमजी फाउंडेशनच्या वतीने कॅम्पस इंटरव्यूचे आयोजित केले होते. चाळणी परीक्षा, प्रत्यक्ष मुलाखतीनंतर या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान आणि मानव्य विज्ञान विद्या शाखेतील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी प्राप्त व्हावी म्हणून या कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले होते. अजीम प्रेमजी फाउंडेशन विद्यापीठातील या दोन्ही विद्या शाखांमधून असोसिएट या पदाकरिता विद्यार्थ्यांची निवड केली आहे. विद्यार्थ्यांच्या मुलाखती अजीम प्रेमजी फाउंडेशनचे रिक्रुटमेंट (स्टेट) अविनाश झाडे, जिल्हा संस्था लीडर प्रियंक श्रीवास्तव, ज्वाय जयंत चौधरी यांनी घेतल्या होत्या. यांच्याकडून घेतल्या जात आहे.
'असोसिएट' या पदाकरिता फाउंडेशनकडून पूर्वी लिखित परीक्षा घेण्यात आली. लिखित परीक्षेकरिता ५९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. लिखित परीक्षा नंतर २२ विद्यार्थी मुलाखतीकरिता पात्र ठरले. या २२ विद्यार्थ्यांच्या दोन दिवस मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर असोसिएट या पदाकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तब्बल ४ लाख ३२ हजार रुपये इतके वार्षिक पॅकेज मिळणार आहे. विद्यापीठामधून शिक्षण पूर्ण होताच कॅम्पस इंटरव्यू च्या माध्यमातून रोजगार प्राप्त झाल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे आभार मानले.